ताज्या बातम्या नांदेड

नांदेड पोलीस दलातर्फे “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने शक्ती रॅलीचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी)-“स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमीत्ताने महिला सुरक्षा जनजागृती करणेसाठी गर्दीचे ठिकाणी, शाळा, कॉलेज मधील मुलींना अडचणीच्या वेळी तात्काळ मदत होण्यासाठी तसेच शहरामध्ये खाजगी शिकवणी व ईतर गर्दीच्या ठिकाणी महिला व मुलींसाठी तात्काळ मदत करण्यासाठी व परिणाम कारक पेट्रोलींग करण्यासाठी हिरो होंडा मो सायकलचे संचालक कोठारे यांच्या प्रयत्नाने नांदेड पोलीस घटकाला हिरो होंडा कंपणीच्या वीस टु व्हीलर देण्यात आल्या होत्या. पोलीस उप महानिरक्षक निसार तांबोळी, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांच्या संकल्पनेतुन शक्ती मोबईलची निर्मीती करण्यात आली.
आज दिनांक 11 ऑगस्ट 2022 रोजी 10.00 वा. शक्ती रॅलीचे उदघाटन महापौर सौ. जयश्री पावडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जि.प.सीईओ वर्षा ठाकुर, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, पोलीस उपअधिक्षक मुख्यालय डॉ. अश्विनी जगताप, कोठारी, हिरो होंडा मोटार सायकलचे संचालक हजर होते. सदर शक्ती मोबाईलचे शहरामध्ये पोलीस अधिक्षक कार्यालय ते राज कॉर्नर परत पोलीस अधिक्षक कार्यालय, नांदेड असे रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर शक्ती रॅलीचे प्रतिनिधीत्व पोउपनि प्रियंका आघाव, गंगुताई नरतावार व पोलीस अंमलदार रंजना शेळके, क्रांती बंदखडके, शुभांगी जाधव, रेखा चक्रधर, पडगीलवार, पदमीन जाधव, सुशिला जानगेवार, सुनिता मलचापुरे, सुनिता मैलवाड, वंदना घुले, बालिका कंधारे, बालिका बर्डे, ज्योती गायकवाड, उज्वला सदावर्ते, सपना पाटील, सुषमा लोखंडे, संतोषी मल्लेवाड, रेणुका पवार, पदमा नलगोंडे, सिमा वच्छेवार, क्रांती गायकवाड, सविता शेळके, वर्षा पवार, कोमल राठोड तसेच दामीनी पथकाचे मपोउपनि प्रनिता बाभळे महिला पोलीस अंमलदार लोपमुद्रा आनेराव, वैशाली कुलथे, शितल पौळ व चालक राजकुमार कोडगिरे यांनी भाग घेतला होता.
सदर कार्यक्रमास व्दारकास चिखलीकर, पोनि स्थागुशा, प्रशांत देशपांडे, जिवीशा, माणिक बेद्रे, आ.गु.शा., तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने हजर होते सदर कार्यक्रमाचे आयोजन रापोनि विजय धोंडगे, पोनि अनिल चोरमले, पोलीस कल्याण विभाग नांदेड, शिवाजी लष्करे, सपोनि तथा जनसंपर्क अधिकारी, श्रीमती एस. एम. कलेटवाड, सपोनि श्रीमती कमल शिंदे, पोउपनि श्रीमती प्रियंका आघाव, श्रीमती स्नेहा पिंपरखेडे, पोउपनि शेरखान पठाण, हे हजर होते. तसेच सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सपोउपनि श्री विट्ठल कत्ते यांनी केले.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *