निलंबित पोलिसच पोलिसांचा टिपर आणि मध्यस्थी
नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड ग्रामीण हद्दीतील पोलिसांनी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाळूची गाडी फिरवून आपल्या हद्दीत नेली आणि त्याच्या कडून आपले हात ‘ओले’ करून घेत आपल्याच पोलीस ठाण्यातून निलंबित पोलीस अंमलदाराच्या मदतीने आपले कौशल्य दाखवले आहे.पीटर मोबाईल मधील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने हि कार्यवाही केली.नांदेड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकामध्ये नव्याने प्रभारी केलेले पोलीस उप निरीक्षक कालच्या रात्री ड्युटी ऑफिसर होते आशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.
आज दिनांक १० ऑगस्ट रोजी रात्री १२.३० ते १ वाजेच्या सुमारास नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील रात्रीचे ड्युटी ऑफिसर आणि सहकारी पोलीस अंमलदार हे आपल्या गुप्त माहिती आधारे गंगाबेट येथून वाळू भरून नांदेड कडे येणाऱ्या हायवा गाडीच्या मागे पाठलाग करत आले.तो पर्यंत हि वाळू भरलेली हायवा गाडी वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत आली होती.प्राप्त झालेल्या खात्रीलायक माहितीनुसार नांदेड ग्रामीणचे रात्रीचे गस्ती पथक आपल्या ड्युटी ऑफिसरसह वजिराबाद हद्दीत आले. काही जण सांगतात की हायवा भरलेली वाळूची गाडी पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरून पुन्हा नांदेड ग्रामीण हद्दीत रवीनगर भागात नेण्यात आली.तेथे नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातून वाळूच्या कार्यवाहीची ‘पहार’ बसल्या नंतर सध्या निलंबित असलेला एक पोलीस अंमलदार मध्यस्थीसाठी आला आणि १० ग्रामचा ‘प्रसाद’ किंबहुना ‘दंड’ देण्याची मध्यस्थी पूर्ण झाल्यानंतर ही हायवा गाडी पुन्हा आपल्या गंतव्याकडे रवाना झाली.आमच्या खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ती हायवा गाडी भनगी येथील एका नामंकित कुटूंबाची आहे. त्या हायवा गाडीचा नंबर एपी —- ११६८ असा आहे म्हणे. गंगाबेट येथे काही दिवसांपूर्वी वास्तव न्यूज लाईव्हने ब्लॅक लिस्टेड हायवा क्रमांक १२५८ ची बातमी प्रसिद्ध केली होती.काल ती १२५८ भरू दिली नाही म्हणून १२५८ शी संबंध असलेल्या निलंबित पोलिसानेच ११६८ ची टीप नांदेड ग्रामीण पोलिसांना दिली आणि नांदेड ग्रामीणच्या नूतन गुन्हे शोध प्रमुखाने ११६८ ला बेकायदेशीर वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पकडून नेले आणि त्यांना ‘पीएसटी’ कर लावला.नांदेड ग्रामीण पोलिसानी ज्या ठिकाणाहून ती हायवा गाडी क्रमांक १६८ नेली आहे.तेथून रवीनगर पर्यंत अनेक ठिकाणी सीसीसीटीव्ही आहेत.पण कोण तपासणी करणार या सीसीटीव्हीची असो. आणि कोणी तपासणी केली तरी कार्यवाही कोण करणार कारण मागील जवळपास १८ महिन्यांपासून असेच सुरु आहे.बातम्यांनी काय होते असे सांगितले जाते असो नाही तर नाही झाले काही ! पण अत्यंत शिस्तप्रिय,कडक कायदा पाळणारे, जनतेसाठीच नेहमी झटणारे,अत्यंत कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांनी आता विश्वास तरी कोणावर करावा. तो एकटे सर्वकाही पाहू शकत नाहीत.असो म्हणतात ना,’जसे पेरू तसेच उगवणार’ कोण घेणार नाही या वृत्ताची दखल तरीही घडलेली घटना मांडण्यासाठी तर लेखणी हातात घेतली आहे. वजिराबाद पोलिस सुद्धा काही करणार नाहीत पण शक्य झाले तर नांदेड शहर उप विभागाचे अत्यंत जबर पोल्सी उप अधीक्षक श्री चंद्रसेनजी देशमुख मात्र या चुकीच्या कृत्यावर काही तरी करतीलच अशी अपेक्षा जनतेला आहे.
संबंधित बातमी …….
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत फक्त एक हायवा गाडीच रेती उपसा करू शकते
एलसीबीशी संबंधित गाडी पोलीस अंमलदाराच्या घरी रिकामी करून घेतली
काही दिवसांपूर्वी एलसीबी मधील एक रामाचा सखा असलेला पोलीस अंमलदार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेला होता म्हणे त्या दिवशी त्याची रात्रीची गस्त होती.त्याच्या जाण्याचे कारण मोठे गंमतीदार आहे.त्याच्या सोबत जुळलेल्या व्यक्तीची एक तीन ब्रास वाळूची गाडी नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडली होती.ती सोडावी म्हणून तो गेला होता एकी कडे एलसीबीचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना सार्वजनिक रीतीने बंधू-बंधु असा आवाज देणारे नांदेड ग्रामीणचे पोल्सी निरीक्षक त्या रामच्या सख्याला म्हणाले की ही तीन ब्रास वाळूची गाडी असर्जन नाक्याजवळ घरचे बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी रिकामी करा आणि जा नाहीतर वाळूच्या अवैध्य कार्यवाहीसाठी तयार रहा अखेर ती गाडी असर्जन जवळ रिकामी करून तो राम सखा परत आला. परत येताना तो नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांची स्तुती करत होता.
काही दिवसांपूर्वी एक १६१६ क्रमांकाची गाडी एका पेट्रोल पंपावर नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडली होती.त्या गाडीसाठी सुद्धा मार्ग बदलायची किमया एका जबरदस्त पोलीस अंमलदाराने दाखवली होती.मग ती गाडी लातूर फाटा येथे सापडली असे दाखवून त्या गाडीला कायदेशीर करण्यात आले होते.आता लातूर फाटा हा नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे हे वेगळे लिहिण्याची गरज नाही.