ताज्या बातम्या नांदेड

केळी उत्पादक शेतक-यांच्या हमी भावावर गंडातर आणणा-या आडत व्यापा-यांवर कार्यवाही करा-आम आदमी पार्टीची तक्रार

 

नांदेड,(प्रतिनिधी)-आज नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालय नवामोंढा नांदेड. यांना नांदेड जिल्हातील केळी मार्केट व्यापा-यानी संगणमत करून आठ दिवसात १३०० रुपये पाडल्या मुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.यामुळे नांदेड जिल्हातील केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला असुन या सर्व काळ्या कृत्यास केळी आडत व्यापारी हेच जबाबदार आहेत अशाप्रकारची तक्रार नांदेड जिल्हा आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम यांच्या नेतृत्वात निवेदनात केलेआहे.

नांदेड जिल्हातील भोकर,अर्धापुर,नांदेड व हिंगोली जिल्हातील कळमनुरी तालुकासह मराठवाड्यातील ९०% केळी उत्पादक शेतकरी असुन सदरील केळी मालावर हमी भाव पाडल्यामुळे प्रती क्विटल १३०० रुपये भाव सुरु असतांना केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हमीभावा वर नियंत्रण आणून कृत्रीम अडचण तयार करुन संगनमताने केळी उत्पादक शेतक-यावर गडांतर आणले आहे.परंतु फळ /भाजी नियंत्रण मुक्त शासनाने केले असतांना विनाकारण केळी उत्पादक शेतक-या कडुन कृषी उत्पादन समिती प्रती गाडी ५०रुपये जाचक कर वसुल करत आहेत असा आरोपही निवेदनात केला आहे.या बाबत जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयाने वैयक्तिक रित्या जातिने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा आम आदमी पार्टी च्या वतीने जन आंदोलन करिल असा ईशारा देखील दिलाआहे.या निवेदनावर आम आदमी पार्टी चे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, जिल्हासरचिटणीस डॉ अवधुत पवार, नांदेड उत्तर व दक्षीण विधानसभाप्रमुख. अँड जगजीवन भेदे, कोषाध्यक्ष संजीव जिंदाल सहसंयोजक डॉ. शुभम महाजन, विशाल जोगदंड यांच्या सह्या आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *