क्राईम ताज्या बातम्या

एक अत्याधुनिक पिस्टल आणि एक गावठी पिस्तुल वजिराबाद गुन्हे शोध पथकाने पकडले

नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबादच्या गुन्हे शोध पथकाने डी गँगमधील एका गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून एक गावठी पिस्टल, दोन जीवंत काडतून जप्त केले आहेत. तसेच दुसर्‍या एका युवकाकडून एक अत्याधुनिक पिस्टल आणि १० जीवंत काढतूस आणि एक मॅग्झीन असे साहित्य जप्त केले आहे.

वजिराबादचे पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांना प्राप्त झालेल्या महितीनुसार डी गँगमधील गुन्हेगार आपली शत्रुता काढण्यासाठी स्वतःकडे पिस्तुल बाळगुण फिरत आहेत. या संदर्भाने शोध घेतला असता वजिराबाद गुन्हे शोध पथक एका युवकावर नजर ठेवून होते. पोलीसांनी चिखलवाडीकडून अबचलनगरकडे जाणार्‍या रस्त्यावर एका युवकाला पाहिले. पोलीसंाना पाहुण तो पळू लागला. पोलीसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्याचे नाव रवि उर्फ रविलाला नारायणसिंह ठाकूर असे होते. हा डी गँगचा सदस्य होता. त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि दोन जीवंत काडतूस सापडले. याबाबत सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय निलपत्रेवार यांच्या तक्रारीवरून रवि उर्फ रविलाला नारायणसिंह ठाकूरविरुध्द गुन्हा क्रमांक २७८/२०२२ भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३/२५ नुसार दाखल करण्यात आला आहे. तसेच गस्तीदरम्यान गुन्हे शोध पथकाने बोअरबन फॅक्ट्रीजवळ आनंद उर्फ चिन्नू सरदार यादव रा.रविनगर कौठा याला ताब्यात घेवून तपासणी केली असता त्याच्याकडे एक अत्याधुनिक पिस्टल, दहा जीवंत काडतूस आणि एक मॅग्झीन सापडले. याबाबत पोलीस अंमलदार गजानन किडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन वजिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २८०/२०२२ दाखल करण्यात आला आहे.

पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकातील अधिकारी संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार विजयकुमार नंदेे, गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, संतोष बेल्लूरोड, शेख इमरान, रमेश सूर्यवंशी, व्यंकट गंगुलवार, बालाजी कदम यांचे कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *