पत्रकार सहवास गृहनिर्माण सोसायटीतील घोटाळ्याचा उल्लेख
नांदेड(प्रतिनिधी)-औरंगाबाद येथील एका व्यक्तीने नांदेड महानगरपालिकेतील माजी मनपा आयुक्त दिपक म्हैसेकर, सुशील खोडवेकर, उन्हाळे, डॉ.सुनिल लहाने या आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांसह रत्नाकर वाघमारे, प्रकाश येवले, अजितपालसिंघ संधू, गुलाम मोहम्मद सादेक, रामकृष्ण डोईजड, सुरेश कुलकर्णी, विरेंद्रसिंघ गाडीलवाले, प्रमोद उर्फ बंडू खेडकर आदींनी केलेल्या अनियमिततेबद्दल चौकशी समिती गठीत करून दोषींवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमप्रमाणे कार्यवाही करावी. यांच्यासोबत या तक्रारीमध्ये जी.श्रीकांत लहुराज माळी, अरुण डोंगरे, विलास भोसीकर, सुधिर इंगोले, बाबासाहेब मनोहरे, पंजाब खानसोळे, संजय जाधव, मेराज अली आदींवर सुध्दा कार्यवाही व्हावी नसता 15 ऑगस्टपासून मी आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करणार आहे अशी तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिली आहे. सोबत या व्यक्तीने 13 जुन 2022 रोजी दिलेली मुळ तक्रार सुध्दा जोडली आहे. ही तक्रार एकूण 8 पानांची आहे. महाराष्ट्र सरकारने ही तक्रार मिळाल्याची ऑनलाईन पावती तक्रारदाराला 2 ऑगस्ट 2022 रोजी पाठवली आहे.
औरंगाबाद येथील श्रीकृष्ण निळकंठराव झाकडे यांनी सन 2002 मध्ये 13 जून 2022 रोजी एक आठ पानी अर्ज तत्कानी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नावे पाठवला होता. त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही म्हणून पुन्हा 2 ऑगस्ट 2022 रोजी नुतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच नगर विकास खाते आहे त्यांना एक पत्र पाठवले आणि 15 ऑगस्टपासून मी मुंबईच्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार असल्याचे त्यात नमुद केले आहे. मुळात श्रीकृष्ण झाकडे हे मनपाच्या आस्थापनेवर विधी सहाय्यक या अनुसूचित जातीसाठी रिक्त असलेल्या पदावर सरळ सेवा भरतीद्वारे स्थापीत झालो होतो. पण मला रुजू करून घेण्यास टाळाटाळ करण्यात आली आणि माझ्या जागी अजितपालसिंघ संधू यांना विधी अधिकारी म्हणून खुर्ची मिळाली. यानंतर श्रीकृष्ण झाकडे यांनी आपल्या मुळ अर्जात बातमीत लिहिलेल्या प्रत्येक नावाच्या व्यक्तीने काय-काय चुकीची कामे केली याचे वर्णन केले आहे. त्यात पत्रकार सहवास गृहनिर्माण संस्था भुखंड घोटाळ्याचा सुध्दा उल्लेख आहे. मी वेगवेगळ्या कामांबद्दल तक्रारी करत राहिलो आणि त्यातील अनियमितता मी सहन केली नाही म्हणून तुला काम करायचे तर कर नाही तर राजीनामा दे असा माझ्यावर दबाव आणला. त्यामुळे मी 3 फेबु्रवारी 2022 रोजी राजीनामा देवून टाकला. राजीनामा दिल्यावर देखील मी महानगरपालिकेतील विविध कामांमधील अनियमितता आदेश रद्द करा अशी विनंती केली. तरी पण त्याच्यावर काही विचार झाला नाही माझी डीसीपीएस जमा रक्कम, रजा रोखीकरण , सातव्या आयोगाची थकबाकी रक्कम, जीआयएस रक्कम सुध्दा मला आजपर्यंत देण्यात आली नाही. त्यामुळे माझे व माझ्या कुटूंबाचे हाल होत आहेत.
आपल्या तक्रारीत श्रीकृष्ण झाकडे नमुद करतात. दिपक म्हैसेकर, सुशील खोडवेकर, उन्हाळे, सुनिल लहाने, रत्नाकर वाघमारे, गुलमा सादेक, अजितपालसिंघ संधू, प्रकाश येवले, सुरेश कुलकर्णी, रामकृष्ण डोईजड, विरेंद्रसिंघ गाडीवाले, प्रमोद खेडकर आदी अधिकारी, कर्मचारी आणि पदाधिकाऱ्यांनी महानगरपालिकेत काम करणाऱ्या इमानदार, प्रामाणिक अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्रास देवून त्यांचे आयुष्य खराब केले आहे. या सर्वांनी अनेक घोटाळे केले आहेत. सोबतच जी.श्रीकांत, माळी, अरुण डोंगरे, संजय जाधव, बाबासाहेब मनोहरे, क्यातमवार, पंजाब खानसोळे, सुधीर इंगोले, विलास भोसीकर, जोंधळे, सतपाल, मेराज अली आदी लोकांनी सुध्दा या महानगरपालिकेतील सत्येचा दुरपयोग करून केलेल्या घोटाळ्यांची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. आपली मागणी मान्य झाली नाही तर आपण 15 ऑगस्ट भारताच्या स्वातंत्र्य महोत्सवातील महत्वाच्या दिवसापासून मुंबईच्या आझाद मैदानात धरणे आंदोलन करणार आहोत असे या पत्रात लिहिले आहे. राज्य शासनाने या पत्राची दखल घेतली असून ऑनलाईन पावती क्रमांक Dept/URDM/2022/18012 नुसार दि.8 ऑगस्ट 2022 ची पावती श्रीकृष्ण निळकंठराव झाकडे यांना पाठवली आहे.
