नांदेड(प्रतिनिधी)-शिवसेनेचे जिल्हाप्रमुख उमेश मुंढे यांची शिवसेना पक्षातून हाकालपट्टी केल्याचे प्रसिध्दीपत्रक शिवसेना सचिव खा.विनायक राऊत यांच्या स्वाक्षरीनिशी प्रसिध्दीस पाठविण्यात आले आहे.
राज्यात झालेल्या राजकीय बदल्यानंतर असंख्य बाबी घडल्या.ज्यामध्ये कालपर्यंत नवीन शिवसेेनेला शिवी देणारे आणि आम्हीच खरे शिवसैनिक आहोत म्हणणारे असंख्य जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. याला प्रतिउत्तर देतांना शिवसेनेने त्या सर्वांना पक्षातून हकालपट्टी केल्याचे जाहीर केले.
अशाच काहीच मंडळीची नांदेडमध्ये काही कमतरता नव्हती. त्यात नांदेड जिल्हा शिवसेनाप्रमुख उमेश मुंढे यांचाही समावेश होता. काल उमेश मुंढे यांचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत व्हायरल झाले. त्याचे प्रतिउत्तर शिवसेना पक्षाच्यावतीने आज 7 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आले आहे. त्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने पक्ष विरोधी कारवाया केल्यामुळे नांदेड जिल्हा प्रमुख उमेश मुंढे यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे लिहिले आहे. या पत्रावर शिवसेना सचिव खा.विनायक राऊत यांची स्वाक्षरी आहे.
