नांदेड(प्रतिनिधी)- जगात एक म्हण प्रसिध्द आहे वासे फिरतात, पण हे वासे का फिरतात याचा कधीच शोध लागलेला नाही. असाच एक प्रकार आज घडला ज्यात नांदेड जिल्ह्यातील माजी मुख्यमंत्री, सध्याचे भोकरचे आमदार यांचे नाव वगळ्यात आले आहे. यालाच वासे फिरले असे म्हणतात.
महानगरपालिकेच्यावतीने मनपा आयुक्त डॉ.सुनिल लहाने हे विनित असलेली एक पत्रिका जारी झाली आहे. ज्यामध्ये भुमिपुजन सोहळा असे लिहिले आहे. नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रात मुलभूत सोयी सुविधा योजनेअंतर्गत 10 कोटी मधील 51 कामांचा हा भुमिपूजन सोहळा आहे. सोमवार दि.8 ऑगस्ट रोजी हा भुमिपुजन सोहळा कॅनॉल रोड तरोडा (बु) नांदेड येथे दुपारी 12.15 वाजता होणार आहे. हा भुमिपुजन सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये प्रमुख पाहुणे 15 लोकांची नावे लिहिले आहेत. त्यातून अशोक चव्हाण यांचे नाव वगळण्यात आले आहे. यालाच वासे फिरले असे म्हणतात. प्रमुख पाहुण्यांमध्ये नांदेड लोकसभा सदस्य खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, विधान परिषद सदस्य आ.विक्रम काळे, आ.सतिश चव्हाण, आ.अमरनाथ राजूरकर, आ.राम पाटील रातोळीकर, विधानसभा सभा सदस्य आ.बालाजीराव कल्याणकर, आ.मोहनराव हंबर्डे, महापौर जयश्री पावडे, पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी, जिल्हाधिकारी डॉ.विपीन, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वर्षा ठाकूर-घुगे, पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे, उपमहापौर अब्दुल गफार अब्दुल सत्तार, स्थायी समिती सभापती किशोर स्वामी, मनपा सभागृह नेता महेश कनकदंडे, विरोधी पक्ष नेता दिपकसिंह रावत, शिक्षण महिला बालकल्याण समिती सभापती श्रीमती अर्पणा नेरलकर आणि शिक्षण महिला बालकल्याण समिती उपसभापती आयशा बेग शेख असलम यांची नावे लिहलेली आहेत. यातील अनुक्रमांकाप्रमाणे 7 आणि 8 तसेच 13, 14 आणि 15 यांची नियुक्ती माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे झालेली आहे. पण अशोक चव्हाण यांना या निमंत्रण पत्रिकेत स्थान देण्यात आले नाही. यालाच वासे फिरले असे म्हणतात. या निमंत्रण पत्रिकेचे विनीत डॉ.सुनिल लहाने आहेत. जे भारतीय प्रशासनिक सेवेचे अधिकारी आहेत.
ही निमंत्रण पत्रिका तयार करणारे, त्याचा मसुदा सांगणारे आणि त्याला अंमलात आणणारे या सर्वांना हा विचार करायला पाहिजे होतो उद्या पुन्हा वासे बदलले तर काय होईल. माजी मुख्यमंत्र्यांसाठी सुध्दा बरेच प्रोटोकॉल आहेत. डॉ.सुनिल लहाने, डॉ.विपीन यांना या प्रोटोकॉलची माहिती नाही काय? असा विचार केला तर त्यांनी जाणून बुजून त्या प्रोटोकॉलकडे दुर्लक्ष केले असेच म्हणावे लागेल. असो वासे फिरल्यानंतर जग बदलतेच हा अनुभव अशोक चव्हाण यांनी आज पहिल्यांदाच घेतला नाही. या अगोदर सुध्दा त्यांना वासे बदलल्याचा अनुभव आलेला आहे. त्याला प्रतिउत्तर कसे द्यायचे हे त्यांनाही माहित आहे, ते देतीलही पण त्याच्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागेल. पण नांदेड शहराच्या 10 कोटीच्या 51 कामांसाठी वास्तव न्युज लाईव्हच्या शुभकामना.
या पत्रिकेत नाव असलेले आमदार, महापौर, सभापती या कामाच्या उद्घाटन कार्यक्रमात जातील की नाही हे मात्र उद्या दिसेल. पण नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत दोन तृतीअंशपेक्षा जास्त संख्येने कॉंगे्रसचे नगरसेवक आहेत. पण या पत्रिकेवर मात्र त्यांनी कोणी वृत्तलिहिपर्यंत आक्षेप घेतलेला नाही याबद्दल मात्र अशोक चव्हाण यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. वाताणूकुलीत कक्षात बसून जनतेेतील लोक आम्हाला शिव्या देतात अशी ओरड करतांना आज आपल्या नेत्याची बेअबु्र झाली आहे यावर नगरसेवक का गप्प आहेत याचा शोध घेण्यासाठी एखाद्या विद्यावाचस्पती पदवी प्राप्त व्यक्ती अध्यक्षतेखाली एखादी उच्चस्तरीय समिती गठीत करावी लागेल.
