ताज्या बातम्या विशेष

भीम घाटवर उठलेली आवई खरीच होती; खंडीभर आरोपींपैंकी चार जणांना अटक; 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

नांदेड (प्रतिनिधी)- भीम घाटावर फारयिंग झाल्याची आवई उठली अशी खबर वास्तव न्यूज लाईव्हने 4 ऑगस्ट रोजी लिहिली होती. पण ती आवई नव्हती तर खरीच फायरिंग झाली होती, असे या घटनेचा एफआयआर सांगते. क्षुल्लक कारणासाठी खंडीभर लोकांना सोबत घेऊन भीम घाटवर फायरिंग करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी 4 जणांना अटक केली असून न्यायालयाने या चौघांना 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

दि. 4 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 3 वाजेदरम्यान भीमघाट परिसरात फायरिंग झाली अशी आवई उठली. उठलेल्या आवईनुसार वास्तव न्यूज लाईव्हने तसे वृत्त प्रसिद्ध केले होते, पण 4 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेच्या सुमारास वजिराबाद पोलीस ठाण्यात स्वप्नील बाबुराव दहिकांबळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून 12 जणांच्या नावासह इतर अशा खंडीभर लोकांविरूद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 307, 143, 147, 148, 149, 504, 506, भारतीय हत्यार कायदा कलम 3/25, 4/25 नुसार गुन्हा क्र. 270/2022 दाखल करण्यात आला. घटना घडताच अपर पोलीस अधीक्षक निलेश मोर यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी पोहचला होता. स्वप्नील दहिकांबळे यांनी लिहिलेल्या तक्रारीनुसार ते आपला चुलत भाऊ सुजित कांबळे यास का मारहाण केली, याची विचारणा करण्यास गेले असताना नंतर काही जणांनी कट रचून एकत्रितपणे त्यांच्या घरावर हल्ला, त्यांच्या हातातील पिस्टलने फायरिंग केली, तलवार, खंजीरचा उपयोग करून दहशत निर्माण केली.

या तक्रारीमध्ये आरोपी या सदरात मोहित उर्फ चिक्कू रमेश गोडगोले, तेजस प्रदीप मोतकुलवाड, अजय गौतम थोरात, रोहन उर्फ काळू माधव नवघडे, अभिजीत उर्फ बेबो भागेंद्र नरवाडे, प्रथमेश कापुरे, यश महेश तादलापूरे, प्रथमेश उर्फ मोनु दीपक सुर्यवंशी, राहूल, गौरव प्रेमसिंग चव्हाण अशा 12 नावांसह इतर गुन्हे असे लिहिले आहे.

घटना घडताच पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार गजानन किडे, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, विजयकुमार नंदे, संतोष बेलुरोड, शेख इमरान, रमेश सुर्यवंशी, व्यंकट गुंगलवार, बालाजी कदम आदींनी घटनेतील गांभीर्य लक्षात घेता 4 तासांत दहशत माजवणाऱ्या हल्लेखोरांपैंकी मोहित उर्फ चिक्कू रमेश गोडबोले, तेजस प्रदीप मोतकुलवाड, प्रथमेश उर्फ मोनु दिपक सुर्यवंशी आणि अनिकेत उर्फ अनिल बालाजी सुर्यवंशी अशा चार जणांना पकडले. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक शिवराज जमदडे यांच्याकडे देण्यात आला. दि. 5 ऑगस्ट रोजी शिवराज जमदडे यांनी पकडलेल्या चौघांना न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने भीम घाटवर गोळीबार करून दहशत माजविणाऱ्यांपैकी चार जणांना 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.

संबंधित बातमी….

भीम घाटवर झाला अस्तीत्वासाठी राडा; फायरिंगची ‘आवई’ उठली

 

गावठी पिस्टल पकडले

4 ऑगस्ट रोजी वजिराबाद पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला प्राप्त झालेल्या अत्यंत गुप्त माहितीनुसार त्यांनी बंदाघाट परिसरातून अजय अरूण टाक वय 22 रा. बागडे गल्ली, शक्तीनगर इतवारा या युवकास पकडले. त्याच्या एक गावठी पिस्टल सापडले. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय निलपत्रेवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून अजय अरूण टाकविरूद्ध भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय मंठाळे करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *