ताज्या बातम्या नांदेड

नांदेड जिल्ह्यात येलो अलर्ट जारी; नागरिकांनी दक्षता घ्यावी;प्रशासनाचे आवाहन

 

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यात दिनांक 4 आँगस्ट ते 8 आँगस्ट दरम्यान एलो अलर्ट जारी केल्याचे आदेश निवासी उप जिल्हाधिकारी प्रदिप कुलकर्णी यांनी जारी केले आहेत. सोबतच नागरीकांनी काय करावे आणि काय करु नये याबाबत सुचना सुध्दा दिल्या आहेत.

पावसाने जिल्याला आज सकाळी धूवून काढले आहे.दरम्यान हवामान खात्याने जारी केलेल्या सुचनांनूसार जिल्हा प्रशासनाने 4 आँगस्ट ते 8 आँगस्ट दरम्यान एलो आलर्ट जारी केला आहे. म्हणजेच विजांच्या गडगडाटांसह पाऊस पडणार आहे.आजही जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने झोडपले होते. काही ठिकाणी ढगफुटी सारखी परिस्थिती होती.म्हणूनच नागरिकांना आता दक्ष राहणे अत्यंत गरजेचे आहे. वास्तव न्यूज लाईव्ह सुध्दा जनतेला आवाहन करत आहे की,आपल्या स्वतःच्या रक्षणासाठी दक्ष राहा आणि इतरांना काय मदत करता येईल याची सुध्दा तयारी ठेवा. तरच निसर्गाने तयार केलेल्या अवघड परिस्थितीला आपण समर्थ पणे सामोरे जावू.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *