ताज्या बातम्या विशेष

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप देताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे, ‘गरज सरी’….

नांदेड (प्रतिनिधी)- भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निरोप देताना त्यांच्याबद्दल दाखवलेली प्रतिक्रिया अत्यंत दुर्देवी आहे. नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने रामनाथ कोविंद राष्ट्रपती पदावर विराजमान झाले होते. आज त्यांच्या जागी अनुसूचित जमातीमधील महिला द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती पदावर वर्णी सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानेच लागली आहे. पण रामनाथ कोविंद पद सोडताना काय बिघडले फक्त देवाला ठाऊक. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्यासमोर दिलेली प्रतिक्रिया पाहिल्यानंतर हेच का आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी असा प्रश्न पडतो. ज्यांनी संविधानाच्या नावावर दोन सत्ता मिळविली. तिसऱ्या वेळेस पण मिळविण्याची तयारी आहे, त्यांना यशही मिळो. पण दुरदर्शनने स्वत: चित्रित रामनाथ कोविंद यांचा आपल्या घरी जातानाच व्हिडीओ पाहिल्यानंतर अश्रू न गाळता दु:ख करावे लागत आहे.

काही दिवसांपुर्वी भारताच्या पंतप्रधान पदावर अनुसूचित जमातीमधील महिला द्रौपद्री मुर्मू यांची नियुक्ती झाली. त्यांनी आपले पद स्वीकारताना त्या पदावरील राष्ट्रपती जे आता माजी झाले ते रामनाथ कोविंद यांना निरोप सुद्धा देण्यात आला. भारतात सर्वात मोठे सभागृह असलेल्या लोकसभेच्या सेंेट्रल हॉलमध्ये हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात सर्वच दिग्गज व्यक्ती उपस्थित होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पहिल्या रांगेतून सभागृहाबाहेर जाताना सर्वांना हात जोडून पाहिले. याच रांगेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी पण उभे होते. पण जेव्हा रामनाथ कोविंद नरेंद्र मोदी समोर आले त्यावेळी काही छायाचित्रकारांकडे पाहत नरेंद्र मोदी यांनी रामनाथ कोविंद यांच्या हात जोडलेल्या परिस्थितीला दुर्लक्षीत केले. त्यांच्या शेजारी केंद्रीय मंत्री पियुष गोयल होते, पण नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया पाहून त्यांनी सुद्धा आपले जोडलेले हात लवकरच खाली घेतले. नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या नरेंद्र मोदी यांची प्रतिक्रिया कळली नाही. त्यामुळे ते अत्यंत श्रद्धेने रामनाथ कोविंद यांच्या समक्ष हात जोडून उभे होते. भारताच्या दूरदर्शनच्या संसद टीव्हीने हा व्हिडीओ रेकॉर्ड केलेला आहे. त्यामुळे तो चुकीचा आहे असे कसे मानता येईल. यावरून फक्त एक म्हणता येईल, गरज सरी मेरी …. पण जगात आपले नाव गाजवणाऱ्या, आपल्या देशाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारताच्या पाचव्या नागरिकाला ही प्रतिक्रिया पाहिल्यानंतर भारतात गाजविली जाणारी लोकशाही किती तुटपूंजी आहे, याचा प्रत्यय येतो.

रामनाथ कोविंद अनुसूचित जातीचे होते, म्हणूनच त्यांना राष्ट्रपतीपद दिले होते. याचा अर्थ अत्यंत मोठा आहे. पण तो उल्लेखीत करून लिहिण्याची ताकद आमच्या लेखणीत नाही. असो पुढे सुद्धा नरेंद्र मोदी किंबहुना भारतीय जनता पार्टीने आता अनुसूचित जमातीच्या व्यक्तीला राष्ट्रपती पदावर विराजमान केले आहे. याचा अर्थ काय हे सांगण्या इतपत सहनशक्ती आमच्याही लेखणीत नाही. असो पण झालेला प्रकार उल्लेखीत केला नसता तर आम्ही आमच्या लेखणीसोबत बेईमानी केल्यासारखे झाले असते. आम्ही या अंतहीन जगात ज्या स्पर्धेमध्ये सामील आहोत, तेथे हरवायला भरपूर आहे, पण मिळवायला काही नाही. यासाठी आज थांबा आणि वर्तमान जीवनाचा खरा उपभोग घ्या असेच म्हणावे लागेल. रामनाथ कोविंद यांची माजी राष्ट्रपती या पदावर आता वर्णी लागली असली तरी भारतीय नागरिकांच्या यादीत त्यांचा क्रमांक पाचवा आहे. आपल्या देशातील पाच क्रमांकाच्या नागरिकांना पंतप्रधानांनी दिलेली वागणुक अशी असेल तर सर्वसामान्य माणुस जो भारतीय लोकशाहीमध्ये सर्वात मोठा मानला गेला त्याची काय अवस्था करतील. सर्वसामान्य नागरिकाचा भारतीय नागरिकांच्या यादीत 27 वा क्रमांक लागतो.

रामनाथ कोविंद यांनी काय असे केले असेल की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांच्या निरोप समांरभात त्यांच्याकडून फिरवलेले डोळे त्याचे कारण आहे. पण या जगात विचारवंत म्हणतात इतरांच्या अस्तित्वाला पायाखाली तुडवून कधीच आपली स्वप्न पूर्ण होत नाहीत. तेव्हा रामनाथ कोविंद यांचे अस्तित्व सुद्धा आज विसरता येणार नाही. आपणच त्यांना त्या पदावर बसवले आणि आपणच जाताना त्यांच्याकडून आपले तोंड फिरवले, यातून जग काय घेईल. हा व्हिडीओ भारतानेच नव्हे तर जगाने सुद्धा पाहिले आहे. आणि या व्हिडीओवरून आपल्या व्यक्तीमत्वाबद्दल जग विचार करेल याची जाणिव पंतप्रधानांना असायला हवी.

राष्ट्रपतींकडे अधिकार काय आहेत. भारतीय लोकशाहीमध्ये संसद सर्वात मोठी आहे. संसदेने पारीत केलेला प्रत्येक निर्णय राष्ट्रपतींना मान्यच करावा लागतो. एखादा निर्णय त्यांना पटला नाही तर ते त्यास पुन्हा विचारासाठी संसदेकडे पाठवू शकतात. पण संसदेने दुसऱ्या वेळेस सुद्धा त्याच पद्धतीने तोच विषय पाठवला तर तो राष्ट्रपतींना मंजुरच करावा लागतो. मग अशा परिस्थितीत काय बिघडले असेल ज्यावर पंतप्रधानांना नाराजी आहे आणि त्यांनी निवृत्त होणाऱ्या रामनाथ कोविंद यांना पाहून दुसरीकडे वळवलेले स्वत:चे तोंड त्यांच्या प्रतिक्रिया सांगतात. आमच्या या लिखाणाने भारतात काही फरक पडेल असे आम्हाला वाटत नाही. तरी पण लिहिणे हे आमचे कर्तव्य आहे आणि म्हणूनच आम्ही हा शब्दप्रपंच करताना रामनाथ कोविंद यांना सांगू इच्छितो की, आपल्या प्रवासातील शेवटचा थांबा आल्यानंतर आपल्याला मिळणारी खिडकीची जागा कोणत्याच कामाची नाही. आपल्या आयुष्यात व्यक्ती, वस्तू ज्या वयात भेटायला हव्यात त्या तेव्हा नाही भेटल्या तर त्याचं महत्व शून्य होत असतं. आपल्या जीवनात घडलेल्या शेवटच्या प्रसंगाला आठवण करण्यापेक्षा रामनाथ कोविंद यांनी मी माझ्या जीवनात काय केले आहे, याचा विचार करून त्यासंदर्भाने आपला पुढील जीवनाचा काळ घालवावा, कारण सौंदर्य हे कपड्यात नाही, तर ते कामात आहे. सौदर्य हे नटण्यात नाही तर ते विचारांमध्ये आहे. सौंदर्य भपक्यात नाही तर साधेपणात आहे. सौंदर्य बाहेर कशात नाही तर मनात आहे. या विचारांवर लक्ष करत रामनाथ कोविंद यांनी आपल्या सोबत घडलेला निरोप समांरभाचा प्रसंग विसरावा आणि आपल्या जीवनाचा भविष्यातील कालखंड अत्यंत दुर्दम्य जगत भारतीय संविधानाची लाज राखत इतरांना त्यातून काय शिक्षण घेता येईल याकडे आपले लक्षकेंद्रीत करावे अशी नम्र विनंती.

या बातमीसोबत दुरदर्शनच्या संसद टीव्हीने तयार केलेला व्हिडीओ वाचकांच्या सोयीसाठी जोडला आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *