नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील रेल्वेस्थानक समोर असलेल्या मयुर लॉज मध्ये एका माणसाचा मृत देह सापडला आहे.तो राजस्थान राज्यातील सीकर जिल्ह्याचा रहिवाशी आहे.अति मद्य सेवनाने रक्त पोटला फोडून बाहेर पडलेले आहे.
काल दिनांक १ ऑगस्ट २०२२ रोजी रात्री ८ वाजता मयूर लॉज मध्ये एक माणूस आला आणि त्याने राहण्यासाठी रूम घेतली. सचिन किशनलाल सोलंकी (४३) रा. भूखंड क्रमांक १९, माधव कॉलोनी,देव ग्यास गोदाम जवळ,सीकर राजस्थान – ३३२००१ असा पत्ता लिहिलेले आधार कार्ड त्याने लॉज व्यवस्थापनाला दिले आहे.त्या आधार क्रमांक ५९७७ ९६५५ ५५२३ असा आहे. आज २ ऑगस्ट रोजी सकाळपासून त्या माणसाने रूमचा दरवाजा उघडलाच नाही तेव्हा लॉज व्यवस्थापनाने वजिराबाद पोलिसांना याबाबत माहिती दिली.तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय मंठाले आणि पोलीस अंमलदार प्रदीप राठोड तेथे गेले आणि रूमचे दार उघडले.त्यात पलंगावर सचिन किशनलाल सोलंकी यांचा मृतदेह पडलेला होता.तेथे दारूची काही रिकामी बाटली सापडली आहे.तसेच आजाराची कागदपत्रे सुद्धा सापडली आहेत.त्यांच्या तोंडातून रक्त वाहून पूर्ण पलंग रक्ताने भरलेला होता.वृत्त लिहिपर्यँत कायदेशीर प्रक्रिया सुरु होती.