वास्तव न्यूज लाईव्हच्या बातमीचा इफेक्ट
नांदेड (प्रतिनिधी)- गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित असलेल्या याचिकेसंदर्भाने पुढे कार्यवाही करावी असे पत्र गुरूद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. पी.एस. पसरीचा यांनी 1 ऑगस्ट रोजी जारी केले आहे. या कार्यवाहीमध्ये होणारा उशीर लक्षात घेत 31 जुलै रोजी वास्तव न्यूज लाईव्हने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. यानंतरच हे पत्र जारी करण्यात आले आहे. डॉ. पी.एस. पसरीचा यांनी दाखवलेल्या या सकारात्मक धोरणाचे अभिनंदन होत आहे.
नांदेड गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने करीमनगर येथील स. मनजितसिंघ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्र. 13611/2021 दाखल केली होती. या याचिकेच्या विषयात शंभर वर्षांपुर्वी एनटीसी मिल (उस्मानशाही मिल)ला दिलेली शंभर एकर जागा परत देण्याचा विषय आहे. मनजितसिंघ यांना जुन्या गुरूद्वारा बोर्डाने ते अधिकार दिले होते. त्यानंतर गुरूद्वारा बोर्ड बरखास्त झाला. ही बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. तेव्हा न्यायालयाने याचिका क्र. 13611 चे वकील ऍड. गणेश गाढे यांना ही कार्यवाही करण्याचे अधिकार गुरूद्वारा बोर्डाने दिले होते,पण आता गुरूद्वारा बोर्ड अस्तित्वात नाही, त्यामुळे या प्रकरणाची पुढील कार्यवाही करण्याचे अधिकार सध्याच्या प्रशासकांचे आहेत काय अशी विचारणा केली. त्यानुसार ऍड. गणेश गाढे यांनी गुरूद्वारा बोर्ड अधीक्षकांना पत्र पाठवून माहिती विचारली होती.या प्रकरणाची पुढील तारीख उद्या दि. 3 ऑगस्ट रोजी आहे.
स. मनजितसिंघ यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर वास्तव न्यूज लाईव्हने या प्रकरणाचे वृत्त प्रकाशित केले होते. स. मनजितसिंघ यांचे म्हणणे आणि वास्तव न्यूूज लाईव्हचे वृत्त या दोघांची दखल घेत डॉ. पी.एस. पसरीचा यांनी 1 ऑगस्ट 2022 रोजी ऍड. गणेश गाढे यांना पत्र क्र. 1297 नुसार रिट याचिका क्र.13611ची कार्यवाही सलगपणे पुढे चालवण्यास मंजुरी दिली आहे.
गुरूद्वारा बोर्डाची जवळपास शंभर एकर जागा एनटीसी मिलला देण्यात आली होती. त्याची लिज मर्यादा संपलेली आहे. त्यासाठी गुरूद्वारा बोर्डाने ही याचिका दाखल केली आहे. ज्यामध्ये ही जागा परत मिळावी, लिज संपल्यानंतर सुद्धा जागा दिली नाही, त्याचे भाडे द्यावे असे विषय आहेत. ज्याठिकाणी ही जागा त्याठिकाणी सुद्धा अनेकांचे हितसंबंध गुंतलेले आहेत, म्हणून या जागेबद्दलची भुमिका संभ्रमावस्थेत होती. पण गुरूद्वारा बोर्ड प्रशासक डॉ. पी.एस. पसरीचा यांनी अत्यंत सकारात्मकपणे त्वरीत प्रभावाने याचिका क्र. 13611ची कार्यवाही पुढे सलग चालू ठेवावी तसे पत्र उच्च न्यायालय खंडपीठ येथील ऍड. गणेश गाढे यांना पाठविले आहे. डॉ. पी.एस. पसरीचा यांनी दाखवलेल्या या सकारात्मक भुमिकेबद्दल आनंद व्यक्त होत आहे.
संबंधित बातमी….