नांदेड(प्रतिनिधी)-वजिराबाद पोलीसांसह शहरातील अनेक पोलीस ठाण्यांनी आप-आपल्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आज पथसंचलन केले. शहरातील शांततेला धोका निर्माण करण्याचा विचार करणाऱ्या लोकांना समज देता यावी म्हणून शहरातील अनेक पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज पथसंचलन केले. शहरात आम्ही कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार आहोत. यादाखवण्यासाठीच हे पथसंचलन काढण्यात आले. वजिराबाद पोलीसांच्या पथसंचलनात पोलीस निरिक्षक जगदीश भंडरवार यांचे नेतृत्व होते.
ऍनराईड फोनच्या मुक्त वापराचा दुष्परीणाम नांदेड(प्रतिनिधी)-हिंदी चित्रपटामध्ये एक गाणे आहे, “भला किजे भला होगा, बुरा किजे बुरा होगा’ अशाच एका पध्दतीने वजिराबाद पोलीसांनी 29 तारखेच्या पहाटे 4 वाजेच्या सुमारास चार दिवसापासून आत्महत्येचा विचार करत नांदेडच्या बसस्थानकावर थांबलेल्या एका 21 वर्षीय युवकाला ओळखले आणि त्याचे समुपदेशन करून त्याला आई-वडीलांसोबत दिवस उजाडल्यावर घरी पाठवून दिले. हा सर्व […]
माहिती गुप्त ठेवण्यात एक आठवडा यश आले;आज दोन जण पोलीस कोठडीत नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड जिल्ह्यात पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्यात ५ कोटी ९३ लाख ६५ हजार ५३६ रुपयांचा अपहार असा मोठा घोळ झाला असून घोळ करणाऱ्या दोघांना मुदखेडचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.बी.भांबरे यांनी चार दिवस,अर्थात २ सप्टेंबर २०२१ पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. भाऊराव […]
नांदेड(प्रतिनिधी)-22 वर्षीय राज प्रदीप सरपेच्या शरिरावर अनेक जखमा करून त्याचा खून केल्याप्रकरणी 9 युवकांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या 9 मधील चार जणांची नावे सविता गायकवाड यांच्यावरील खोट्या जीवघेणा हल्ला प्रकरणात सामील आहेत. त्यातील तीन जणंाना अटक झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन दिलेला आहे आणि नवीन खून प्रकरणात त्या चौघांसह इतर पाच जणांची नावे समाविष्ट […]