नांदेड(प्रतिनिधी)-26 जुलै रोजी काकांडीच्या बसस्थानकावर एका अज्ञात वाहनाच्या धडकेत एका अज्ञात महिलेचा मृत्यू झाला आहे. याबाबत तिच्या नातलगांची माहिती व्हावी म्हणून नांदेड ग्रामीण पोलीसांनी शोध पत्रिका जारी केली आहे.
दि.26 जुलै रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास काकांडी बसस्थानकाजवळ एका अज्ञात वाहनाने अज्ञात महिलेला धडक दिली. त्यात त्या महिलेचा मृत्यू झाला. याबाबतची माहिती अंकुश नागोराव गायकवाड यांनी दिल्यावरुन गुन्हा क्रमांक 463/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 279, 304(अ) नुसार गुन्हा दाखल झाला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरिक्षक बी.के.नरवटे यांच्याकडे देण्यात आला आहे.
महिला अनोळखी असल्याने तिची ओळख पटावी म्हणून बी.के.नरवटे यांनी एक शोध पत्रिका जारी केली आहे. त्यानुसार अज्ञात मरण पावलेल्या महिलेचे वय 45 वर्ष असेल, रंग सावळा आहे, उंची 167 सेंटीमिटर आहे. केस काळे आहेत, हिरव्या, पिवळ्या गुलाबी रंगाची साडी या महिलेने परिधान केलेली होती. तिचा बांधा सडपातळ आहे. पोलीस उपनिरिक्षक बी.के.नरवटे यांनी जनतेला आवाहन केले आहे की, या वर्णनाच्या महिलेला कोणी ओळखत असेल तर याबद्दलची माहिती पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण येथे द्यावी तसेच पोलीस ठाणे नांदेड ग्रामीणचा दुरध्वनी क्रमांक 02462-226373 आणि पोलीस उपनिरिक्षक बी.के.नरवटे यांचा मोबाईल क्रमांक 8149863325 यावर सुध्दा माहिती देता येईल.
