नांदेड (प्रतिनिधी)- 1 लाख 20 हजार रूपये किंमतीच्या तीन दुचाकी गाड्या उमरी, मुखेड आणि अर्धापूर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरीला गेल्या आहेत.
विश्वनाथ चंद्रेशखर यांची दुचाकी गाडी क्र. एम.एच.26 बी.के. 0184 ही 35 हजार रूपये किंमतीचे दुचाकी गाडी 17 जुलैच्या सायंकाळी 6 ते 18 जुलैच्या पहाटे 7 वाजेदरम्यान व्यंकटेशनगर उमरी येथील त्यांच्या घरासमोरून चोरीला गेली आहे. उमरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे, पोलीस अंमलदार अधिक तपास करीत आहेत.
सुदाम नागोराव बोडके यांची एम.एच.26 ए.जे.2265 ही 35 हजार रूपये किंमतीची गाडी जाहूर ता. मुखेड येथून 24 जुलैच्या सकाळी 9 ते 25 जुलैच्या सकाळी 6 वाजेदरम्यान चोरीला गेली आहे. मुखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस अंमलदार पांडे अधिक तपास करीत आहेत.
तहसील कार्यालय अर्धापूर येथून 21 जुलै रोजी दुपारी 3 ते सायंकाळी 6 अशा तीन तासांच्या काळात नासेर खान पठाण जाफर खान यांच्या मालकीची 50 हजार रूपये किंमतीची दुचाकी गाडी क्र. एम.एच. 26 ए.एन. 7532 चोरीला गेली आहे. अर्धापूर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस अंमलदार राठोड करीत आहेत