नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जबरी चोरी घडली आहे. भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक घरफोडी झाली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एटीएम तोडण्याचा प्रयत्न झाला आहे. तसेच भाग्यनगर आणि बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोबाईल चोरीला गेले आहेत. आणि बिलोलीच्या आठवडी बाजारातून एक मोबाईल चोरीला गेला आहे.
स्वप्नील विश्र्वनाथ वसमतकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 24 जुलै 2022 रोजी ते संकेत हॉस्टेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर फटाले गॅरेजसमोर थांबले असतांना चार जण आले आणि त्यांना पकडून त्यांच्या खिशातील फोन 60 हजार रुपये किंमतीचा आणि रोख रक्कम 10 हजार असा 70 हजारांचा ऐवज बळजबरीने काढून घेतला आहे. विमानतळ पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक बाळू गिते हे करीत आहेत.
निकिता स्वप्नील लोखंडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 23 जुलैच्या रात्री 10.30 ते 24 जुलैच्या पहाटे 9.30 वाजेदरम्यान त्यांच्या मालकीची आदित्य मेडिकलमधून एक संगणक आणि रोख 3 हजार असा 12 हजारांचा ऐवज कोणी तरी चोरून नेला आहे. भाग्यनगर पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार मंगनाळे हे करीत आहेत.
दि.23 जुलैच्या रात्री 9 ते 24 जुलैच्या सकाळी 9 वाजेदरमयान वाजेगावच्या पोलीस चौकी शेजारी असलेले एटीएमचा दरवाजा तोडून कोणी तरी एटीएममधील पैसे चोरण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार गोपाळ दत्तराम देशमुख यांनी दिली. नांदेड ग्रामीण पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलीस अंमलदार सातारे हे करीत आहेत.
भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 35 हजार रुपये किंमतीची एक दुचाकी चोरीला गेली आहे. चोरी झालेली गाडी पोलीस मुख्यालयातील पोलीस अंमलदाराची आहे. बिलोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एका व्यापाऱ्याची 7 हजार रुपये किंमतीची दुचाकी चोरीला गेली आहे. बिलोली येथील आठवडी बाजारातून 18 हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल चोरीला गेला आहे. याबाबत सुध्दा गुन्हा दाखल आहेत.
