नांदेड(प्रतिनिधी)-जगात अनेक जागी अनेक संघटनांना चालवणारी मंडळी एक दिसते आणि पदाधिकारी दुसरेच असतात. अशाच परिस्थितीला पुढे रिमोट कंट्रोल असा एक शब्द रुढ झाला. याच संज्ञेमध्ये खांडल विप्र संघटनेची नांदेड शाखा सभा सुध्दा आता संम्मिलीत झाली आहे असेच चित्र सुरू आहे. कोणाला आपल्या उद्देशांना साध्य करण्यासाठी पदे हवी आहेत. तर कोणाला राज्यस्तरावरील संघटनेला मी किती मोठा आहे हे दाखविण्यासाठी जिल्हा संघटनेवर वर्चस्व हव आहे. समाजाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांना समाज कधी कळलाच नाही अशा अवस्थेत काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांच्या दोऱ्यांवर सर्वच कटपुतळ्या हलत आहेत.
सामाजिक संघटन बनवतांना त्याचा मुळ उद्देश प्रत्येक व्यक्तीला समाजाच्या स्तरावर सोबत घेवून चालणे हा आहे. सामाजिक संघटनांच्या कार्यकारण्या ग्रामस्तरापासून देशपातळीवर सुध्दा आहेत. कांही -काही जागी यांची मर्यादा आहे. ज्याला जसे आवडेल त्याने तसे काम करायचे आहे. अशा परिस्थितीतून समाजाचे काम करण्याचा आव आणणाऱ्यांना कधी हे कळलेच नाही कि समाज काय आहे. लाभ या शब्दाचा उलट अर्थ भला असे आहे. यानुसार लाभ हवा असेल तर भल कराव लागेल. किंवा भल हव असेल तर लाभ करावा लागेल. पण या सर्व बाबींना सामाजिक विषय वगळून स्वत:च्यासाठी लाभ आणि भला या शब्दांना जोडले जात आहे. त्यामुळे सामाजिक संघटन एकत्रित न राहता ते वेगवेगळ्या जागी विखुरले आहे. प्रत्येक माणसाला मी बरोबर आहे, खरा आहे असे दाखविण्याची सवय लागली आहे. सामाजिक स्तरावरा काम करत असतांना मी हा शब्द वगळावा लागतो. त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्ही हा शब्द हवा. पण आम्ही या शब्दाला जागा देण्याची गरज कोणालाच वाटत नाही.
कोणाला आपल्या लेकरांचे लग्न होईपर्यंत सामाजिक संघटनांमध्ये पद हवी असतात. कोणाला इतरांना दाखविण्यासाठी ती पदे हवी असतात. कांही लोकांना अत्यंत उच्च दर्जाची पदे दिल्यानंतर जे लोक कधी काळी आपल्या समोर नतमस्तक होत होते अशा लोकांना दाखविण्यासाठी त्यांनी उच्चे पदे असतांना अत्यंत कनिष्ठ दर्जाची पदे स्विकारली. कोणाचा बाप कोणाशी बोलत नव्हता याची चर्चा त्यांच्या मृत्यूनंतर करत आजच्या पिढीतील युवकांना चुकीचा मार्ग दाखविण्याची एक जबर तयारी सुरू आहे. विषय अनेक आहेत. सर्वच लिहिली तर त्याचा परिणाम कोठे होईल याचा नेम नाही.
खांडल विप्र शाखा सभा नांदेडमध्ये एक बाहेरचा व्यक्ती मीच या शाखा सभेचा सर्वकाही आहे असे दाखवतो. सध्याचे पदाधिकारी त्याला भिष्म पितामह समजतात. अनेक गावांना भटंकती करून कोणाच्या जोरावर नांदेडला स्थायीकत्व पत्कारले याचा विसर त्याला पडला आहे. सध्याच्या शाखा सभेतील पदाधिकाऱ्यांचा अभ्यास केला तर काही असे पदाधिकारी आहेत की, ज्यांना पुर्वी कधीच जवळ येवू दिले जात नव्हते. त्यांनी कधीच सामाजिक कामामध्ये सहभाग पण घेतला नाही पण आज त्यांना समाजाच्या स्तरावर पद देण्यात आली आहेत. या सर्व एकंदरीत अभ्यासावरून असे वाटते की, नांदेडची खांडल विप्र शाखा सभा रिमोट कंट्रोलवर चालणारी शाखा सभा आहे. पदाधिकाऱ्यांमध्ये एवढा दमही नाही की, त्यांनी आपले निर्णय घ्यावेत . कसे होईल आता समाजाचे भले याचा विचार केला तर अत्यंत अवघड परिस्थिती आहे.
