नांदेड (प्रतिनिधी)- कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेब यांच्या नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या साम्राज्यात खंडेलवालला खंडणी मागण्यात आली आहे. नांदेड ग्रामीण पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
सुरेश रामकरण खंडेलवाल हे आचारी व्यवसाय करणारे व्यक्ती कौठा परिसरात राहतात. दि. 17 जुलै रोजी त्या भागात सुरेश खंडेलवाल यास बलजितसिंघ भाटीया उर्फ सल्लू महाराज हा व्यक्ती भेटला आणि तुला कौठा परिसरात रहायचे आहे, तुझा व्यवसाय करायचा आहे तर तु मला दरमहा 2 हजार रूपये दे नाहीतर मी मागेल तेव्हा 2 हजार रूपये द्यावे लागतील नाहीतर मी तुला खतम करून टाकील असे म्हणून शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. नांदेड ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा क्र. 435/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 385, 504, 506 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास अत्यंत कडक शिस्तीचे पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आनंद बिच्चेवार यांच्याकडे देण्यात आला आहे.