नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड शहरातील नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष,निस्पृह,इमानदार पोलीस निरीक्षक साहेब श्री अशोकरावजी घोरबांड हे नाहक त्रास देत असल्याची तक्रार लोहा येथील शिवसेनाचे माजी नगरसेवक रमेश गोविंदराव माळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याना दिली आहे.
लोहा येथील माजी नगरसेवक रमेश गोविंदराव ,माळी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबई येथे जाऊन भेट घेतली. रमेश माळी यांनी दिलेल्या तक्रारी नुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे अत्यंत कर्तव्यदक्ष,निस्पृह,इमानदार पोलीस निरीक्षक साहेब श्री अशोकरावजी घोरबांड यांनी रमेश माळी यांच्यावर खोटा गुन्हा दाखल केला आहे.त्या गुन्ह्यात भारतीय दंड संहितेची कलमे ३७१,४३०,४३२,४३९,१०९,३४,४८(७),८४(८) २३६,१७७,१५८ अशीजोडली आहेत.मी माझा छोटासा व्यवसाय करतो परंतु जाणीव पूर्वक मला त्रास देण्यासाठी श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांनी मला नाहक त्रास देत आहेत.सोबत माझ्याविरुद्ध तडीपार आणि मकोका असे जबरदस्त गुन्हे दाखल करणार अशी धमकी देत आहेत.मी मागील १२-१४ दिवसांपासून घराबाहेर आहे.तरीही श्री अशोकरावजी घोरबांड साहेब माझ्या घरातील कुटुंबियांना सुद्धा रात्री अपरात्री मानसिक त्रास देत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे या सोबतच रमेश माळी यांनी मागणी केली आहे की,नांदेडच्या पोलीस अधीक्षकांना संपर्क करून चर्चा करावी,माझ्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले खोटे गुन्हे मागे घ्यावेत आणि अत्यंत जबरदस्त व्यक्तिमत्व असलेले पोलीस निरीक्षक श्री अशोकरावजी घोरबांड साहेबांची तात्काळ बदली करावी आणि मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा अशी विनंती केली आहे.