नांदेड(प्रतिनिधी)-हदगाव येथे प्रतिष्ठीत व्यापाऱ्याच्या घरी दरोडेखोरांनी शस्त्रांसह धुडगुस घालून मारहाण करून तेथून 71 तोळे सोने असा जवळपास 40 लाखांचा ऐवज लुटून नेला आहे. हदगाव शहरात प्रतिष्ठीत व्यापारी यादवअप्पा गंधेवार यांच्या घरी रात्री दरोडेखोरांनी धुडगुस घातला. यादव गंधेवार यांचे वय 104 वर्ष आहे. त्यांच्या पत्नीचे वय अंदाजे 100 वर्ष असेल. त्यांची एकच मुलगी आहे प्रतिभा शेट्टी, प्रतिक्षांचा मुलगा आहे प्रमोद शेट्टी, प्रमोद शेट्टीचा मुलगा आहे डॉ.पवन शेट्टी आणि त्यांची पत्नी प्रसन्ना शेट्टी पवन आणि प्रसन्नाचे 6 महिन्याचे बाळ आहे. हे सर्व कुटूंब एकत्रीत घरात राहते. गंधेवार कुंटूबियांकडे अंदाजे 150 एकर शेत जमीन आहे. वडीलोपार्जित सोने, चांदी असा मोठा ऐवज त्यांच्या घरात असल्याने ते वडीलोपार्जित श्रीमंत व्यक्ती आहेत. 16 जुलैच्या रात्री 1.30 वाजेच्यासुमारास कांही दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या मागील बाजून आत प्रवेश मिळवला आणि 100 वर्ष वयाच्या पती-पत्नीला एका खोलीत डांबून इतर सर्व कुटूंबियांना दरोडेखोरांनी जबर मारहाण केली. सहा महिन्याच्या बाळाला पाहुन दरोडेखोरांनी त्याच्या गळ्यावर चाकु ठेवला आणि गंधेवार कुटूंबियांकडून चाब्या हस्तगत केल्या आणि सर्वच कपाटे उघडली आणि त्यातील आजच्या परिस्थितीत सर्वात महागडा ऐवज सोन्याचे दागिणे जवळपास 40 लाख रुपयांचे, 71 तोळे वजनाचे लुटून नेले. दरोडेखोरांनी जातांना गंधेवार व शेट्टी कुटूंबियांना एका खोलीत डांबले आणि निघून गेले. सकाळी 4.30 वाजेच्यासुमारास डांबले लोक दार तोडून बाहेर आणि सकाळी 6 वाजता पोलीस स्टेशन हदगाव गाठले. हदगावचे पोलीस निरिक्षक हनुमंत गायकवाड यांनी त्वरीत घटनास्थळाचा ताबा घेतला, श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण केले आणि त्यानंतर श्वान फक्त 50 मिटर जावून भरकटला. शेजारच्या गल्लीतील दोन दुचाकी गाड्या पळून जाण्यासाठी चोरट्यांनी वापरल्या असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. विविध पध्दतीने पोलीस या मारहाण आणि लुटीचा तपास करीत आहेत.
