ताज्या बातम्या महाराष्ट्र

पावसाळी अधिवेशन पुढे ढककले; सरकार कधी होणार स्थिर ?

नांदेड,(प्रतिनिधी)- विधानसभेचे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आल्याचे पत्र विधानमंडळ सचिवालयातील प्रधान सचिव राजेंद्र भागवत यांनी 15 जूलै 2022 रोजी जारी केले आहे.

विधान मंडळाचे पावसाळी अधिवेशन दिनांक 18 जूलै 2022 पासून मुंबई विधान भवनात आमंत्रीत करण्याची घोषणा मागील अधिवेशन संस्थगित करतांना करण्यात इली होती.पण आता दिनांक 18 जूलै 2022 पासून सुरु होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलले आहे.संसदीय कार्य विभागाने पुढील तारीख कळवल्यानंतर यथा अवकाश अधिवेशन बोलवण्यात येईल आणि त्या संदर्भाचे पत्र पुन्हा निर्गमीत होईल असे भागवत यांनी जारी केलेल्या पत्रात लिहले आहे.

या निर्णयाने शासनाच्या स्थिरतेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण करण्यास शंका आहे. आम्ही बदल्याचे राजकारण करणार नाहीत, असे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात सांगीतले होते. पण खरे तर बदले घेणे सुरु झाले आहे. रात्रीतून पोलीस निरिक्षकांच्या बदल्या केल्या जात आहेत. ऐके काळी ज्या पोलीस निरिक्षकांची बाजू समर्थपणे सांभाळणारे पोलीस अधिक्षक सुध्दा बदलले आहेत.नविन सरकार मधील आमदार, खासदार सुध्दा आपले वर्चस्व दाखवण्यासाठी दंड थोपटत आहेत. तशी या आमदार आणि खासदारांच्या चमच्यांची विविध कार्यालयात वारी वाढली आहे.

खरे तर अद्याप राज्याचे शासनच समर्थ पणे टिकलेले नाही. अधिवेशन पुढे ढकलण्यातील ‘खलबत’ काय आहे हे समजणे अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही. सरकारच्या पाडापाडीत मात्र सर्वसामान्य नागरीक आता त्रस्त होत चालला आहे. त्यांच्या कामांचे काय यावर मुख्यमंत्री आणि उप मुख्यमंत्री महोदयांनी जरुर विचार करावा.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *