ताज्या बातम्या नांदेड

ऑनलाईन फसवणूक केलेले 6 लाख रुपये सायबर सेल पोलीसांच्या मेहनतीने पुन्हा बॅंक खात्यात

नांदेेड(प्रतिनिधी)- नांदेड जिल्ह्यातील सायबर सेल पोलीस पथकाने केलेल्या विद्युतगती कार्यवाहीमुळे एका व्यक्तीचे ऑनलाईन थकवलेले सहा लाख रुपये पुन्हा त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले आहे.
पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गौतम मारोती भावे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांना विद्युत बिल अपडेट करून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर एसएमएस आला. त्यासोबत त्यांना मोबाईल नंबर पाठविण्यात आले. त्यावर त्यांनी कॉल करून माहिती घेतली असता. बोलणाऱ्या अनोळखी व्यक्तीने त्यांना क्वीस्पोर्ट नावाचा ऍप डाऊनलोड करायला लावला आणि त्या ठकबाजी करून त्यांच्या बॅंके खात्यातील सहा लाख रुपये परस्पर काढून घेतले. आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच गौतम भावे यांनी ही माहिती पोलीस स्टेशन भाग्यनगर येथे दिली. घडलेला प्रकार हा सायबर गुन्हा विषयक आहे. म्हणून भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे यांनी हा प्रकार पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे यांना सांगितला आणि या गुन्ह्यावर काम करण्याची जबाबदारी सायबर सेलचे पोलीस निरिक्षक नानासाहेब उबाळे यांच्यावर देण्यात आली. घडलेला प्रकार हा भंयकरच होता. सायबर गुन्हे विभागातील पोलीस उपनिरिक्षक सोपान थोरवे पोलीस अंमलदार विलास राठोड यांनी फसवणूक झालेले गौतम भावे यांच्याकडून सविस्तर माहिती जमा केली आणि तात्काळ संबंधीत बॅंक, वॉलेट नोडल अधिकारी यांच्यासोबत ईमेलद्वारे संपर्क साधून या प्रकरणाचा पाठपुरवा केला. घडलेल्या प्रकारातील गांभीर्य पाहता सायबर विभागाने संबंधीत बॅंका, वॉलेट नोडल अधिकारी यांच्यासोबत वारंवार संपर्क करून या प्रकरणाचा अखेर छडा लावला आणि पोलीसांनी केलेल्या मेहनतीला अखेर यश आले. अखेर गौतम भावे यांचे ठकले गेलेले 6 लाख रुपये पुन्हा त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले.
पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, गृहपोलीस उपअधिक्षक डॉ.अश्र्विनी जगताप, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे, सायबर सेलचे नानासाहेब उबाळे आणि त्यांच्या संपुर्ण पथकाचे कौतुक केले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *