ताज्या बातम्या नांदेड

महावितरणचा खांब बांधकामात घेवून सुरू आहे बांधकाम

नांदेड(प्रतिनिधी)-आपल्या घराच्या बांधकामात एमएसईबीचे खांब आत घेवून बांधकाम केल्याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर सुध्दा वीज वितरण कंपनीने कोणतीच कार्यवाही केलेली नाही.
शहीदपुरा भागात राहणारे गुरविंदरसिंघ विक्रमसिंघ गिल यांनी सहाय्यक कार्यकारी अभियंता महावितरण कार्यालय येथे दिलेल्या अर्जानुसार त्यांच्या घराजवळच सिमरणकौर दिलीपसिंघ टेलर, नवज्योतसिंघ धरमसिंघ लष्करे, देशराजसिंघ धरमसिंघ लष्करे हे आपल्या मालकीच्या जागेपेक्षा जास्त बांधकाम करत आहेत. या बांधकामाजवळच महावितरण कंपनीचा एक खांब आहे. त्यावरुन या भागातील बऱ्याच नागरीकांना विज पुरवठा होता. पण सुरू असलेल्या बांधकामामध्ये बांधकाम करणाऱ्यांनी वितरण कंपनीचा लोखंडी खांब आपल्या बांधकामात घेवून टाकला आहे. त्यावरील विद्युत पुरवठ्याचे वायर दुसऱ्या खांबावर नेऊन अडकून टाकले आहेत. विद्युत पुरवठ्याच्या वायरांमध्ये अनेक जागी वायर जोडण्यात आले आहेत. तो सुध्दा धोका आहे. दुसरा खांब हा महाविरणचा नाही तो खाजगी आहे आणि हे सर्व काम एका खाजगी माणसाने केल्याचे अर्जात लिहिले आहे. या बेकायदेशीर वीज कनेक्शनमुळे मला व माझ्या कुटूंबाला धोका होवू शकतो असे गुुरविंदरसिंघ गिलने आपल्या अर्जात लिहिले आहे. गुरविंदरसिंघ सांगत होते की, वीज वितरण कंपनीचे लोक तेथे आले पण मलाच विचार होते की, काय कार्यवाही करावी. या संबंधाने मी मनपा आयुक्तांना सुध्दा तक्रार दिली आहे पण अद्याप काही कार्यवाही झालेली नाही. या अर्जाची एक प्रत कार्यकारी अभियंता महावितरण यांना सुध्दा देण्यात आली आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *