

नांदेड(प्रतिनिधी)-विमानतळ पोलीसांनी दोन युवकांना पकडून त्यांच्याकडून 3 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या सहा दुचाक्या जप्त केल्या आहेत.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार विमानतळचे पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात विमानतळ येथील गुन्हा शोध शाखेचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक बाळू गीते,पोलीस उपनिरिक्षक जाधव, पोलीस अंमलदार बंडू कलंदर, दारासिंग राठोड, माधव नागरगोजे आणि दाता गंगावारे यांनी दोन युवकांना ताब्यात घेतले. त्यांची नावे महेश बालाजी मुंढे (19) रा. शिव \नगर नांदेड आणि गोविंद आनंदा कदम (24) रा.गोविंदनगर नांदेड अशी आहेत. या दोघांकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा क्रमांक 42/2022 आणि 234/2022 मध्ये चोरी गेलेल्या दोन दुचाकी चोरल्या होत्या. यासोबत त्यांनी चोरलेल्या इतर चार दुचाकी गाड्या पोलीसांना काढून दिल्या आहेत. या सर्व दुचाकी गाड्यांची किंमत 3 लाख 50 हजार रुपये आहे.
उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस पथकाचे पोलीस अधिक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले आहे.