ताज्या बातम्या नांदेड

विठ्ठलाची वारी पुर्ण होण्याअगोदर त्याने सुरू केलेला नैसर्गिक शॉवर आता त्रास देत आहे

नांदेड(प्रतिनिधी)-गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यात अनेक त्रास उभे केले आहेत. नांदेड शहरापासून बाहेर जाण्यासाठी असलेले गोदावरी नदीवरील पुल आता ओसंडून वाहण्याच्या तयारी आहेत. जिल्ह्यातील अनेक जागी रस्ते बंद झाले आहेत. विष्णुपूरी धरणातील पाण्याचा ऐवा 379 क्युमेक्स आहे.विष्णुपूरी प्रकल्पातून बाहेर जाणारा पाण्याचा प्रवाह 812 क्युमेक्स आहे. विष्णुपूरी प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. आजचा पाण्याचा जीवंत साठा प्रकल्पात 83.65 टक्के झाला आहे.
गेले तीन दिवस पावसाने आपली हजेरी लावलेली आहे. कमी अधिक वेळात कधी जोरदार तर कधी रिमझीम अशा पध्दतीत पाऊस सुरू आहे. पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी विठ्ठलाने नैसर्गिक शॉवर सुरू गेला आहे. वारकरी मंडळी विठ्ठलाच्या नावाचा गजर करत याही परिस्थितीत हळूहळू त्याचे दर्शन घेण्यासाठी पुढे-पुढे जात आहेत. विठ्ठलाच्या नावातील श्रध्देचा हा गजर सुरू आहे.
नांदेड शहरात आणि जिल्ह्यात पावसाची परिस्थिती आता त्रासदायक ठरत आहे. सखलभागांमध्ये पावसाचे पाणी साचत आहे, घरांमध्ये पाणी पोहचले आहे. त्यातून आपल्या घराला सुरक्षीत कसे ठेवता येईल याचा विचार करत जनता आपल्या दररोजच्या कामांमध्ये थोडासा उशीरा भाग घेत आहे. नांदेड शहरातून बाहेर जाणाऱ्या आसना नदीवरील दोन, गोदावरी नदीवरील पाच पुल ओसंडून वाहण्याच्या तयारीत आहेत. अनेक जागी शेत जमीन खरडून निघाली आहे. प्रशासनाच्यावतीने सर्व प्रकारच्या परिस्थितीत तयारी ठेवण्यात आली आहे. अनेक जागी पुरात अडकलेले लोक बाहेर काढण्यात आले आहेत.


जनतेने प्रशासनाच्या विश्र्वासावर राहण्याऐवज स्वत:चे सुरक्षीत स्थळ शोधणे आवश्यक आहे. तसेच इतरांना सुध्दा मदत करण्याची ही वेळ आहे. प्रशासन आपल्या पध्दतीने काम करतच असते. पण आपल्या सुरक्षीततेचा विचार आपण स्वत: करा अशी विनंती वास्तव न्युज लाईव्ह सर्व वाचकांना करत आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *