क्राईम ताज्या बातम्या

अक्षय रावतची पोलीस कोठडी तीन दिवस वाढली

नांदेड,(प्रतिनिधी)- नांदेड येथे घडलेल्या खंडणी प्रकरणात अक्षय रावतची पोलीस कोठडी न्यायालयाने आज तीन दिवसांसाठी वाढवून दिली आहे.

नांदेडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एक खंडणी प्रकरणाचा गुन्हा नांदेडच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे तपासासाठी वर्ग करण्यात आल्या नंतर आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक माणिक बेदरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक हणमंत मिटके यांनी अक्षय भानुसिंह रावत या युवकास अटक केली.प्रथमवर्ग दंडाधिकारी न्यायालायने अक्षय रावतला ५ जुलै ते ७ जुलै असे कोठडीत पाठवले होते.आज पोलीस कोठडी समाप्त झाल्यानंतर हणमंत मिटके आणि त्यांच्या पोलीस अमंलदारानी अक्षय रावतला न्यायालयासमक्ष हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली.तपासातील प्रगती पाहून न्यायालयाने अक्षय रावतला तीन दिवस वाढीव पोलीस कोठडीत पाठवले आहे.अगोदर दोन दिवस आणि आता तीन दिवस अशी पोलीस कोठडी अक्षय रावतला मिळाली आहे.

संबंधित बातमी….

 

खंडणी प्रकरणात अक्षय रावतला दोन दिवस पोलीस कोठडी 

 

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *