नांदेड(प्रतिनिधी)-सेवानिवृत पोलीस उपअधिक्षक आणि नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेती स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांचे वडील मल्लीकार्जुन काशीनाथ स्वामी (82) यांनी स्वत:वर बंदुुकीची गोळी झाडून आत्महत्या केली आहे.
प्राप्त झालेल्या माहितीनुसार रात्री 12 वाजेच्या सुमारास भाग्यनगर कमानीजवळ बंगला क्रमांक 60 मध्ये राहणारे मल्लीकार्जुन काशिनाथ स्वामी (82) यांनी बाथरुममध्ये त्यांच्या जवळ असलेल्या बाराबोअर बंदुकीने स्वत:च्या हानवटीखाली आपल्याच हाताने गोळी झाडून घेवून आत्महत्या केली आहे. भाग्यनगर पोलीसांनी त्याठिकाणी जावून तपासणी केली आहे. त्यांनी सुसाईड नोट लिहिलेले आहे. त्यात स्वत:ला असलेले श्वसनाच्या त्रासामुळे आत्महत्या करत आहे. कोणाबद्दल काही तक्रार नाही.
मल्लीकार्जुन स्वामी हे नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतील स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांचे वडील आहेत. स्वामी कुटूंबियांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि.4 जुलै 2022 रोजी सायंकाळी 4 वाजता त्यांच्यावर मुळगाव आखाडाबाळापूर जि.हिंगोली येथे अंतिमसंस्कार होणार आहेत. भाग्यनगर पोलीस ठाण्यात वृत्तलिहिपर्यंत कोणतीही कायदेशीर र्कावाही पुर्ण झालेली नव्हती.
