९१ हजार रुपयांचा’ सामाजिक कृतज्ञता निधी ‘प्रदान
नांदेड(प्रतिनिधी)- आपल्या अभ्यासू, समर्पित आणि लढाऊ वृत्तीने मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा, फुले-शाहू-आंबेडकरी सामाजिक आणि राजकीय चळवळीत गेली 5 दशके अमूल्य योगदान देणारे ज्येष्ठ नेते एन. डी. गवळे ह्यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त प्रज्ञासूर्य समता परिषद सामाजिक कृतज्ञता सोहळा समितीच्या वतीने एका भव्य सोहळ्यात पुष्पहार, मानपत्र,’आंबेडकरी योद्धा ‘हा पुरस्कार आणि सामाजिक कृतज्ञता निधी देऊन गौरव करण्यात आला.
2 जुलै रोजी कै. नरहर कुरुंदकर सभागृह, पीपल्स कॉलेज परिसर,नांदेड येथे दिमाखात पार पडलेल्या ह्या सोहळ्यास उद्घाटक म्हणून सुप्रसिद्ध विचारवंत, साहित्यिक डॉ. व्यंकटेश काब्दे, अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध चिकित्सक तथा ज्येष्ठ समाजसेवक डॉ, श्रीहरी कांबळे,प्रमुख वक्ते म्हणून आंबेडकरी ज्येष्ठ नेते दादाराव कयापाक,सुप्रसिद्ध विधिज्ञ तथा वक्ते ऍड. विजय गोणारकर,प्रज्ञाताई गवळे हे मान्यवर उपस्थित होते.
तसेच विचारपीठावर समिती पदाधिकारी विजय भोरगे,डॉ. भीमराव वनंजे,एन एम.झडते उपस्थित होते.
सोहळ्याच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले.
आणि दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे स्वागत समिती पदाधिकारी अशोक मल्हारे,एन.जी.वाघमोडे,प्राचार्य पद्माकर जोंधळे,रामचंद्र देठे,प्रभाकर ढवळे,सुभाष सुर्यतळ,सुजाताताई पोपलवार ह्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.
त्यानंतर सुप्रसिद्ध गायक बी. के.कांबळे, रमेश दामोदर ह्यांनी अप्रतिम बुद्ध-भीम गीते गायिली. त्यास भीमराव तेले, स्वप्नील धुळे ह्यांनी संगीत दिले.
प्रज्ञासूर्य समता परिषदेचे अध्यक्ष आणि मुख्य संयोजक डॉ. विलासराज भद्रे ह्यांनी प्रास्ताविक केले.समितीचे अध्यक्ष राज गोडबोले ह्यांनी भूमिका मांडली.
ह्यानंतर सर्व मान्यवर आणि पदाधिकारी ह्यांच्या हस्ते एन डी. गवळे ह्यांना मानपत्र,’आंबेडकरी योद्धा’हा पुरस्कार आणि संयोजन समितीच्या आर्थिक योगदानातून 21 हजार रु.रोख ‘ सामाजिक कृतज्ञता निधी देऊन गौरविण्यात आले.
त्यानंतर आपल्या भाषणातून मान्यवर पाहुण्यांनी ‘ त्याग,लढावू बाणा, अभ्यासू वृत्ती ह्याद्वारे चळवळीसाठी सर्वस्व अर्पण करून एन.डी. गवळे ह्यांनी कार्य केले.त्यांच्या मराठवाडा नामांतर संग्राम आणि अनेक संघर्षाचे आम्ही साक्षीदार आहोत.त्यांचा हा गौरव नवीन पिढीला दिशादर्शक ठरेल.तसेच अत्यंत कमी वेळात सुंदर नियोजन करून अशा समर्पित योद्ध्याला ह्या ऐतिहासिक सोहळ्यातून अभिवादन करणारे संयोजक विशेष अभिनंदनास पात्र आहेत ‘ असे मत प्रभावीपणे मांडले.
मानपत्राचे वाचन कुलदीप नंदूरकर ह्यांनी केले.सूत्रसंचालन मिलिंद ढवळे ह्यांनी केले आणि आभार डॉ. रामचंद्र वनंजे ह्यांनी आभार मानले.
ह्यानंतर ‘ आम्ही अल्प वेळेत नियोजन करून गवळे सरांना दिलेला निधी अल्प आहे.पण ज्यांना निधी द्यायची इच्छा आहे.त्यांनी निधी द्यावा ‘असे डॉ. भद्रेनी आवाहन करताच तब्बल ७० हजार रु. निधी चळवळीवर प्रेम करणाऱ्या उपस्थित अनेक मान्यवरांच्या योगदानातून उभा झाला.आणि एन.डी.गवळे ह्यांना विचारपीठावर तब्बल ९१ हजार रुपयांचा निधी रोख आणि चेकद्वारे देण्यात आला.
ही चळवळीतील एक ऐतिहासिक घटना ठरली.दर्जेदार आणि शिस्तबद्ध संयोजन, अत्यंत प्रभावी भाषणे,ऐतिहासिक निधी आणि भावपूर्ण सत्कार लक्षणीय ठरला.ह्यावेळी सर्व दात्यांची नावे जाहीर करून त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करण्यात आले.
गौरवमूर्ती एन.डी.सरांनी भावपुर्ण शब्दात सत्काराला उत्तर देत नव्या चळवळीसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले.
ह्याप्रसंगी प्रजासत्ताक पार्टीचे अध्यक्ष सुरेशदादा गायकवाड ह्यांनी गवळे दाम्पत्याचा पुष्पहार आणि कपडेरुपी भेट देऊन सत्कार केला.तसेच ख्यातनाम विचारवंत प्रा.डॉ. ऋषीकेश कांबळे,सुप्रसिद्ध उद्योजक प्रकाश पाटील चितळकर, आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते रमेशदादा सोनाळे,माधवदादा जमदाडे तसेच नेत्र रोग तज्ञ डॉ. दिलीप खंदारे,प्रा.डॉ. भास्कर दवणे, डी. डी. भालेराव, डॉ. बबन जोगदंड, पत्रकार सदाशिव गचे,इंजि. भीमराव हटकर, कोंडदेव हटकर,सतीश कावडे तसेच विविध तालुक्यातून आलेल्या असंख्य चाहत्यांनी एन.डी.गवळे ह्यांचा भव्य सत्कार केला.
ह्या अविस्मरणीय सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.सुनीलचंद्र सोनकांबळे, इंजि. शिवाजी सोनकांबळे, सत्यपाल नरवाडे,नितीन ऍंगडे, गंगाधर झिंझाडे,प्रीतम भद्रे,बुद्धभूषण सोनकांबळे,अनुराग रायबोळे,गौरव ढगे,सचिन गायकवाडआदींनी परिश्रम घेतले.