हिंगोली ते पुर्णा विद्युतीकरण लवकरच
नांदेड(प्रतिनिधी)-दक्षीण मध्य रेल्वेच्या परिक्षेत्रातील हिंगोली-वाशीम या दोन रेल्वे स्थानकादरम्यानचा 46.30 किलो मिटर लांब रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाल्याची माहिती मुख्य जनसंपर्क अधिकारी सी.एच.राकेश यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे पाठविली आहे. यामुळे अकोला ते हिंगोली 126 किलो मिटरचा रेल्वे मार्ग विद्युतीकरण झाला आहे. दक्षीण मध्य रेल्वे विभागाने हे एक उत्कृष्ट काम केले आहे.
अकोला पुर्णा या 209 किलो मिटर मार्गाचे विद्युतीकरण करण्याच्या मागणीला सन 2017-18 मध्ये मान्यता मिळाली होती. त्यासाठी 277 कोटी रुपये मंजुर करण्यात आले होते. या कामाला 33.05 किलो मिटर हे काम मार्च 2021 मध्ये पुर्ण झाले आणि आता 45.03 किलो मिटरचा मार्ग मार्च 2022 मध्ये पुर्ण झाला. त्यानंतर आता 46.03 किलो मिटरचा मार्ग पुर्ण झाला आहे. एकूण अकोला ते हिंगोली या 126 किलो मिटर मार्गाचे विद्युतीकरण आता पुर्ण झाले आहे. उर्वरीत हिंगोली ते पुर्णा हा 84 किलो मिटरचा रेल्वे मार्ग लवकरात लवकर विद्युतीकरण पुर्ण करण्यासाठी अत्यंत जलदगतीने काम सुरू आहे. नवीन इलेक्ट्रीक मार्गामुळे इंधनाची बचत होईल आणि गतीमध्ये वाढ होईल. जनरल मॅनेजर अरुणकुमार जैन यांनी नांदेड डिव्हिजनमध्ये विद्युतीकरणाच्या कामावर देखरेख करून त्यास पुर्ण करणाऱ्या सर्व रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.