नांदेड(प्रतिनिधी)-भोकरफाटा ते नांदेड रोड वरील त्रिकुटफाटा या रस्त्यावर एस.टी.गाडी एका टेम्पोला धडकली. धडक दिलेला टेम्पो ऍटोवर जावून कोसळला. यात एक 53 वर्षीय महिला गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे.
आज दुपारी 12 वाजेच्यासुमारास त्रिकुट फाटा जवळ एस.टी.क्रमांक एम.एच.06एस.8810 ने टेम्पो क्रमांक एम.एच.22 ए.ए.2607 ला धडक दिली. धडक दिल्यानंतर टेम्पो ऍटो क्रमांक एम.एच.26 बी.डी.4417 वर जोरदारपणे आदळला. या तिहेरी धडकेत ऍटोतील महिला रत्नमाला राधाकिशन पाटकर (53) रा.मस्तानपुरा नांदेड या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपनिरिक्षक भोसले, पोलीस अंमलदार मोरे, शिंदे हे घटनास्थळी गेले आणि तेथे विस्कळीत झालेली वाहतुक पुन्हा सुरळीत केली.
