ताज्या बातम्या नांदेड

सिख युवकांच्या हाती तलवारीसोबत उत्कृष्ठ लेखणी देणार-डॉ.पी.एस.पसरीचा

नांदेड(प्रतिनिधी)-दशम पातशाहजींच्या आशिर्वादाने मला दुसऱ्यांदा सचखंड श्री हजुर साहिब येथे सेवा करण्याची संधी प्राप्त झाली आहे. या संधी दरम्यान माझ्या युवकांच्या हातातील तलवारीसोबत मला त्यांच्या हातात उत्कृष्ठ लेखणी पाहायची आहे. प्रत्येक व्यक्तीची तक्रार मी ऐकण्यास तयार आहे आणि सर्वांच्या साथीने माझ्या काळात झालेली कामे पुन्हा एकदा जोमाने सुरू करणार आहे आणि नवीन काय प्रकल्प महाराजांच्या चरणी मी अर्पण करू शकतो यासाठी प्रयत्न करणार आहे असे प्रतिपादन सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे नवनियुक्त प्रशासक, माजी पोलीस महासंचालक डॉ.पी.एस.पसरीचा यांनी केली.
दोन दिवसांपुर्वी डॉ.पसरीचा यांची नियुक्ती गुरूद्वारा बोर्डाच्या प्रशासक पदावर करण्यात आली. नियुक्तीमध्ये आज कार्यकाळ कमी दिसत असला तरी आहे तेवढ्या वेळेत जास्तीत जास्त सेवा करता यावी म्हणून डॉ.पसरीचा आपली नियुक्ती होताच नांदेड येथे आले. आज पत्रकार रामप्रसाद खंडेलवाल, विजय जोशी, वास्तव न्युज लाईव्हचे संपादक कंथक सुर्यतळ यांनी डॉ. पसरीचा यांची भेट घेवून त्यांना मिळालेल्या नवीन जबाबदारीसाठी शुभकामना प्रेषित केल्या, तेंव्हा ते बोलत होते.
आम्ही ज्या गुरू महाराजांच्या आशिर्वादाने जन्म घेतला आहे. त्यांनी दिलेल्या शिकवणुकीमध्ये तलवार आम्हाला प्राप्त झाली आहे. पण बालके आणि युवक यांच्या हातात तलवार जेवढी शोभुन दिसते त्याच पध्दतीने मला त्यांच्या हातात उत्कृष्ठ लेखणी यावी यासाठी प्रयत्न करायचा आहे. शिक्षण क्षेत्रात काम करतांना समाजातील सर्व पालकांना भेटून त्यांच्या पाल्यांसाठी सार्वजनिक रित्या प्राथमिक शिक्षण ते उच्च शिक्षण या संदर्भाने काय प्रगती करता येईल. यासाठी प्रयत्न करणार आहे.
मी गुरु-ता-गद्दी कार्यक्रमामध्ये नांदेड येथे सेवा केलेली आहे. त्यावेळेस मी तयार केलेले बरेच प्रकल्प देखभाली अभावी रखडले आहेत. त्यात लेझर शो सुरु करणार आहे, अर्धवट राहिलेले म्युझियम पुर्ण करून ते सुरू करणार आहे. संगणकांचा जास्तीत जास्त उपयोग करणार आहे. गुरू महाराजांच्या चरणी माझ्या सेवा देतांना या सर्व धार्मिक कामांना मी एक व्यावसायीक स्वरुप आणणार आहे. जेणे करून इतरांना नांदेडचे कार्य आदर्श वाटले पाहिजे. दर्शनासाठी येणाऱ्या श्रीमंतांसाठी येथे भरपूर सोयी आहेत. पण आता गरीब श्रध्दाळूसाठी मी निवाऱ्याची नवीन सोय करणार आहे. मागे काय झाले यावर बोलण्यापेक्षा भविष्यात काय छान करता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. भुतकाळाऐवजी भविष्याचे बोलणे मला आवडते. नांदेड येथील युवा लोकांना सोबत घेवून मी प्रत्येक समस्या ऐकणार आहे आणि त्यांना पसंत असतील अशी कामे करणार आहे. सर्वांच्या सहकार्याशिवाय माझी इच्छा पुर्ण होणार नाही तेंव्हा प्रत्येकाने माझ्यासोबत येवून काय नवीन करायचे आहे यावर चर्चा करावी ते अंमलदात आणण्याची जबाबदारी मी नक्कीच उचलणार आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *