नांदेड(प्रतिनिधी)-एका रहिवासी सोसायटीमधील कांही लोकांना हाताशी धरुन सर्वांची जमीन खाऊन टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार जणांविरुध्द न्यायालयाच्या आदेशानंतर शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
रमेश व्यंकागौड केसरे हे मंथन पार्क सहकारी गृहनिर्माण संस्थेचे सदस्य आहेत. गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष विठ्ठलरा भिमराव पडलवार उपाध्यक्ष अशोक शिवमराव पडलवार यांनी बांधकाम व्यवसायीक युनायटेड बिल्ड कॉनचे भागिदार किशोर मधुसुदन लोहाटी आणि ज्ञानेश्र्वर रामभाऊ कदम यांच्या सोबत संगनमत करून दुय्यम निबंधक कार्यालयात कागदपत्रांमध्ये बदले केला आणि बनावट कागदपत्रे खरी आहेत असे भासवून मंथन पार्क सोसायटीची जागा हडप करण्याचा प्रयत्न केला. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 251/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 407, 420, 468, 471, 415आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदशात पोलीस उपनिरिक्षक कांबळे हे करीत आहेत.
भुखंडांचे श्रीखंड खाण्याच्या प्रकारात अनेक नवनवीन घटना समोर येत आहेत. मंथन पार्क सोसायटीच्या एका दुसऱ्या सदस्याच्या तक्रारीवरुन असाच एक फसवणूकीचा गुन्हा या प्रकरणातील आरोपी सदरात असलेल्या लोकांविरुध्द दाखल झालेला आहे. भुखंडांचे श्रीखंड करून खाणे हा प्रकार आता सर्वांच्यासाठी कमी वेळात श्रीमंत होण्याचा प्रकार झाला आहे.
