कंधार (प्रतिनिधी)-महाराष्ट्रात दरवर्षी 1 जुलै रोजी कृषी दिन साजरा होत असतो. माजी माजी मुख्यमंत्री आणि हरिक्रांतीचे जणक स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंती कृषी दिन साजरा केला जातो.
वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविद्यालय नेहरुनगरच्यावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभव हा कार्यक्रम कृषी आणि औद्योगिक सलग्नता उपक्रम म्हणून कंधार तालुक्यातील मौजे गुट्टेवाडी येथे 1 जुलै रोजी साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुट्टेवाडी येथे कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. अनेक प्रकारची विविध फळे देणारी झाडे, शोभीवंत रोपे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी गावामध्ये सुध्दा वृक्षारोपण केले. शेतकऱ्यांना फळ झाडे आणि त्यांची रोपे वाटप केली.
याप्रसंगी गुट्टेवाडी गावच्या सरपंच सौ.प्रेमीला केशव गुट्टे, ग्रामसेवक डी.बी.गुट्टे, पोलीस पाटील गित्त, चेअरमन देवराव गुट्टे, जि. प. प्रा शाळेचे मुख्याध्यापक व्ही. एच चव्हाण,सहशिक्षक एस. बी. पवळे आणि इतर, कृषी दुत सुनील वाघमारे, सुरेश जोगदंड, गौरव व सुनील वाघमारे उपस्थित होते.
वसंतराव नाईक ग्रामीण कृषी महाविदयालयाचे चेअरमन संजय पवार, प्राचार्य डॉ.आर. बी.पवार, कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.व्ही. एस. पवार, प्रा. राऊत यांच्या मार्गदर्शनात हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
