नांदेड(प्रतिनिधी)-हिरा गु्रपच्या संचालिका, त्यांचे संचालक आणि प्रवर्तन एजंट यांनी 1 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर दाखल केली आहे.
मोहम्मद इब्राहिम मोहम्मद यासिम यांनी न्यायालयात केलेल्या मागणीनुसार हिरागु्रपच्या संचालिका नवहिरा शेख त्यांचे संचालक, व्यवस्थापन, एजंट यांनी गुंतवणूकदारांना जमा केलेली रक्कम व्याजासह तर परत दिलीच नाही आणि मुळ रक्कम सुध्दा परत केली नाही. न्यायालयाने आदेशानंतर शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा क्रमांक 249/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 420, 409, 34 नुसार दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक डॉ.नितीन काशीकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक कांबळे यांच्याकडे देण्यात आला आहे.
