नांदेड(प्रतिनिधी)-सामाजिक कार्यकर्ते कैलास सावते यांच्या वाढदिवसानिमित्त नेहमीच्या हारतुऱ्यांना फाटा देवून कैलास सावते यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या चाहत्यांनी सुध्दा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यक्रमात हातभार लावला.
नांदेड येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास सावते यांनी आपल्या जन्मदिन साजरा करतांना आपल्या चाहत्यांना आवाहन केले होते की, माझ्यासाठी सन्मान करायला हार तुरे न आणता शालेय विद्यार्थ्यांना कामी येतील अशा वस्तु आणा. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांच्या चाहत्यांनी शाळेतील मुलांसाठी उपयोगी असणाऱ्या वह्या, पेन, पेन्सील, खोडरबर असे साहित्य कैलास सावते यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांना भेट दिले. कैलास सावते यांनी आपल्यासाठी भेट आलेले सर्व शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप केले. सोबतच आपल्या जन्मदिनी संध्या छाया वृध्दाश्रम येथे अन्नदान, वृक्षारोपण, नेतरोग तपासणी, नेरली कुष्ठधाम येथे अन्नदान असे विविध कार्यक्रम घेवून सामाजिक कामात आपली इच्छा दाखवली.
या कामासाठी रतन लोखंडे, संभाजी गायकवाड, नितीन कांबळे, राजू कांबळे, आतिष थोरात, सुनिल नरवाडे, लक्ष्मीकांत तेले,निखील दुंडे, कुणाल थोरात, अमोल पाईकराव, कुणाल कांबळे, आशिष जाधव, मुकूल गायकवाड, शिलवंत वाठोरे, बंटी गजभारे, अभिजित कांबळे, नागसेन हनमंते, प्रदीप नरवाडे यांनी परिश्रम घेतले.