नांदेड(प्रतिनिधी) -महाराणा प्रताप चौकाजवळ एस.टी.बस चालकाला शिवीगाळ करून मारहाण करणाऱ्या एकाला विमानतळ पोलीसांनी अटक केली आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील बस चालक साईनाथ बाबूराव किरतवाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.30 जून रोजी दुपारी 3.30 वाजेच्यासुमारास ते एस.टी.बस क्रमंाक एम.एच.20 बी.एल.3995 चालवत असतांना चार चाकी गाडी क्रमांक एम.एच.04 जी.डी.2136 च्या कार चालकाने त्यांची एस.टी.गाडी अडवून त्यांना शिवीगाळ केली, थापडबुक्यांनी आणि काठीने मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
विमानतळ पोलीसांनी या तक्रारीवरुन गुन्हा क्रमांक 223/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 353, 332, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक अनिरुध्द काकडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस अंमलदार लोखंडे यांच्याकडे तपास देण्यात आला. विमानतळ पोलीसांनी चार चाकी गाडीचा मालक खुशाल माधवराव जाधव (52), रा.शेकापुर ता.कंधार ह.मु.बजरंग कॉलनी नांदेड यास अटक केली आहे.
