नांदेड(प्रतिनिधी) -अक्षय रावत, राजू बिल्डर, अशोक उमरेकर त्यांच्या सोबत गुड्डू आणि इतर पाच जणांविरुध्द 15 लाख रुपये खंडणी मागण्याचा गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हा शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
दत्तनगर येथील सुदाम किशन राऊत (62) यांनी 28 जून रोजी दिलेल्या तक्रारीनुसार बाफना उड्डाणपुलालगत सर्व्हे क्रमंाक 77 आणि सीटी सर्व्हे क्रमांक 10845 मध्ये असलेल्या दोन शटर बाबत वाद घालून अक्षय रावत, राजू बिल्डर, अशोक उमरेकर त्यांच्यासोबत गुड्डू आणि इतर पाच जणांनी त्या जागेवर येवून जागेच्या ताब्यात 15 लाख रुपयांची खंडणी मागितली. त्या शटरला लावलेले लॉक तोडून स्वत:चे लॉक लावून ते निघून गेले. या तक्रारीवरुन शिवाजीनगर पेालीसांनी गुन्हा क्रमांक 246/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 385, 143, 147 आणि 506 नुसार दाखल केला. आता या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस निरिक्षक माणिक बेद्रे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक हनमंत मिटके यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
