नांदेड(प्रतिनिधी)- अत्यंत शुल्क कारणावरुन देगाव (कुराडा) आणि मालेगाव येथे दोन जातीमध्ये मारहाणीचा प्रकार आज सकाळी आणि त्यानंतर घडला. वृत्तलिहिपर्यंत या बाबत कोणत्याही गुन्ह्याची नोंद झाल्याची माहिती प्राप्त झाली नाही.
मालेगाव येथील काही युवक काल सायंकाळी गावाकडे जात असतांना देगाव कुराडा येथे कांही युवकांसोबत दुचाकीचा कट मारल्याच्या कारणावरुन वाद झाला. हे प्रकरण मालेगावला गेलेल्या युवकांनी आपल्या समर्थकांना सांगितले. आज सकाळी देगाव कुराडा येथील मराठा युवकांनी अनुसूचित जातीच्या वस्तीवर मालेगाव येथे हल्ला केला. त्यात बर्याच लोकांना मारहाण झाली. याचे प्रतिउत्तर मालेगावच्या अनुसूचित जातीच्या युवकांनी दिले. घटनेची माहिती मिळताच बराच मोठा पोलीस फौजफाटा मालेगाव येथे पोहचला. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, कांही जणांनी पोलीसांवर सुध्दा दगडफेक केली. घडलेल्या घटने संदर्भाने पोलीसांनी मराठा समाजा विरुध्द अँट्रोसिटी कायदा आणि अनुसुचीत जाती विरुध्द जीवघेणा हल्ला या सदरात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.पोलीसांवर मिरची पूड टाकून जीवघेणा हल्ला या सदरात एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.