ताज्या बातम्या नांदेड

नांदेड जिल्ह्यात 9 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड (प्रतिनिधी)- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 230 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 6, नांदेड ग्रामीण 1, हिमायतनगर 1, नागपूर 1 असे एकूण 9 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 893 एवढी झाली असून यातील 1 लाख 156 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 45 रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 2, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यातर्गत गृह विलगीकरणातील 1 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 39, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3 असे एकुण 45 व्यक्ती उपचार घेत आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा. याचबरोबर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती.

एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 8 हजार 29

एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 812

एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार 893

एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 156

एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692

उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.33 टक्के

आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-निरंक

आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-1

आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक

रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-45

आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *