

नांदेड,(प्रतिनिधी)- भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर विद्यालय धुप्पा येथे उद्या दिनांक ३० जून रोजी काही शिक्षकांचा सेवापूर्ती गौरव आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा होणार आहे.
३० जून रोजी सकाळी ११ वाजता संत ज्ञानेश्वर विद्यालय धुप्पा येथे भारतीय प्रशासनिक सेवेतील अधिकारी सौम्या शर्मा यांच्या हस्ते प्रा.बालाजी बिरादार सर,उत्तमराव रुमाले सर यांनी आपली सेवा पूर्ण केली म्हणून,तसेच इयत्ता १० वी / १२ वी चे यशवंत विद्यार्थी यांचा सन्मान सोहळा आयोजीत करण्यात आला आहे.या कार्यक्रमात कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवरावजी पाटील शेळगावकर प्रथम अध्यक्ष संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता समिती,महाराष्ट्र राज्य,मुंबई,प्रमुख पाहुण्या देगलूर उप विभागाच्या सहायक जिल्हाधिकारी सौम्या शर्मा या प्रमुख मार्गदर्शक असतील.पोलीस ठाणे रामतीर्थचे सहायक पोलीस निरीक्षक विलास जाधव हे प्रमुख उपस्थित असतील.या कार्यक्रमात सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन संत ज्ञानेश्वर मा./उच्च मा.विद्यालय,धुप्पा शंकरनगरचे प्राचार्य संजय पाटील शेळगावकर यांनी केले आहे.