हिंदु वीरशैव लिंगायत मंच देवगिरी प्रांताची नांदेड जिल्हा बैठक संपन्न
नांदेड (प्रतिनिधी)-आगामी काळात होणाऱ्या 2021 च्या जनगणना अभियानात वीरशैव लिंगायतांनी धर्माच्या काॅलममध्ये धर्म म्हणून हिंदू धर्म अशीच नोंद करावी यासाठी महाराष्ट्र प्रांतात प्रत्येक जिल्ह्यात वीरशैव लिंगायत समाज बांधवामध्ये जनजागृती करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज नांदेड जिल्ह्याची बैठक विविध मान्यवर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या बैठकीला उध्दबोधन करण्यासाठी हिंदू विरशैव लिंगायत मंचचे प्रांत पालक हेमंतराव हरहरे जी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक शरद जी गंजीवाले, प्रांत कार्यकर्ते गजानन जी धरने, पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया संयोजक राहुल जी पावले, भावीन पाठक यासह हिंदू विरशैव लिंगायत मंच देवगिरी प्रांत सहसंयोजक रामदास पाटील सुमठाणकर, वैद्यकीय आघाडी प्रदेश संयोजक डॉ. अजित गोपछडे, भाजपा जिल्हा सरचिटणीस डॉ. माधव पाटील उच्चेकर यांचे वीरशैव लिंगायत समाज बांधवांना जनगणनेच्या संदर्भात मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
वीरशैव लिंगायत समाज बांधवांची राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक सामाजिक सद्यस्थिती व भविष्यातील प्रगती याविषयी मोलाचे मार्गदर्शन रामदास पाटील सुमठाणकर यांनी केले.
बैठकीचे प्रमुख व्याख्याते श्री शरद जी गंजीवाले यांनी वीरशैव लिंगायतांची संस्कृती, संस्कार, संतसाहित्य, गुरू परंपरा, पंचाचार्य, शिवाचार्य, मठपरंपरा, हिंदू धर्मीयांनी संघटित राहण्याचे फायदे व हिंदू धर्मापासून विभक्त होण्याने होणारे नुकसान याविषयी सखोल व अभ्यासपूर्ण विवेचन आपल्या मधुर वाणीतुन विषद केले. प्रांत कार्यकर्ते गजानन जी धरने यांनी मंचाची संघटनात्मक भूमिका मांडली तर बैठकीचे समारोप हिंदू विरशैव लिंगायत मंचाचे प्रांत पालक श्री हेमंतराव जी हरहरे यांनी केले.
बैठकीला नांदेड जिल्ह्य़ातील मुखेड, कंधार,लोहा, देगलूर, बिलोली, नायगाव, उमरी धर्माबाद तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाज बांधव उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी समाजबांधवांना धर्माच्या काॅलम मध्ये हिंदू धर्म अशी नोंद करावी असे आवाहन केले.