नांदेड(रामप्रसाद खंडेलवाल)-23 जून रोजी ऍड. मनिष रामेश्र्वर खांडील(शर्मा) यांनी कटरचून दोन बालकांना आपल्या हस्तकांमार्फत पळविण्याचा प्रकार आता पुर्णपणे उघडकीला आला आहे. भाग्यनगर या विषयात काय कार्यवाही करतात ही प्रक्रिया अजून शिल्लक आहे.
23 जून रोजी शहराच्या पश्चिम भागात जवळपास सर्वात शेवटी स्थित असलेल्या पोतदार शाळेत दुपारी 2 वाजता एक नाट्य घडले. या नाट्यात घडलेला प्रकार असा आहे आपली दोन मुले आणि आपल्या दिराची दोन मुले आणण्यासाठी एक महिर्ला पोतदार शाळेत दुपारी 2 वाजता पोहचली. प्राप्त झालेल्या एका सीसीटीव्ही फुटेजप्रमाणे ती महिला चारही लेकरांना घेवून आपल्या वाहनाकडे जात असतांना ती चार लेकरे पळत पुन्हा त्या महिलेकडे आली. या सोबतच त्या चार लेकरांमागे आणखी एक महिला पळत आली. जिने आपल्या डाव्या हातात गुंड बांधतात तसा कपडा बांधलेला होता. चार पैकी दोन लेकरांना ती ओढू लागली. लेकर घेण्यासाठी गेलेल्या महिलेने सेक्युरीटी सेक्युरीटी अशी ओरड केली. त्यावेळेस तेथे हजर असलेले शाळेचे सुरक्षा रक्षक, अनेक वाहनांचे चालक त्या ठिकाणी पोहचले आणि त्या महिलेने आपल्या जन्म दिलेल्या दोन लेकरांना विसरून आपल्या दिराच्या लेकरांची सुरक्षा केली. लेकरांना घेवून जाण्यासाठी आलेली त्यांची आई शाळेच्या गेटजवळ आली तेंव्हा तिच्या मागे दोन युवक धावत आले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती महिला त्या दोन युवकांना काही तरी बोलत आहे असे दिसते. पण शाळेच्या सुरक्षा रक्षकाने आणि पोतदार शाळा प्रशासनाने त्यांची सुरक्षा केली आणि काही वाईट प्रकार घडला नाही. आजही ती चार लेकरे सुरक्षीत आहेत. दररोज शाळेत जात आहेत आणि आपल्या भविष्याचा विचार करीत आहेत.
हा घटनाक्रम पुर्ण समजण्यासाठी वास्तव न्युज लाईव्हने दि.25 जून रोजी लिहिलेले वृत्त सुध्दा आम्ही या बातमीसह जोडत आहोत. जी महिला बार्शीहुन आली होती. ती ऍड.मनिष रामेश्र्वर खांडील (शर्मा) यांच्या नेतृत्वातच हे काम करत होती अशी तक्रार बालकांना सुरक्षीत ठेवणाऱ्या आईने भाग्यनगर पोलीस ठाण्यात दिली आहे. पती-पत्नीमधील भांडण असतांना सन्माननिय ऍड. श्री.मनिष रामेश्र्वर खांडील यांनी मी दररोज कायद्यासोबत खेळतो असे वक्तव्य अनेकांसोबत केले आणि आपल्या एका हस्तकाला ती बालके बार्शीतील महिलेला मिळवून देण्याची सुपारी दिली. प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक गाडी डी मार्ट मॉलजवळ उभी होती. त्यात महिलेसोबत युवकांना पाठवणारा म्होरक्या बसलेला होता आणि दुसऱ्या गाडीत ते दोन युवक बार्शीच्या महिलेसोबत तेथे आले होते. या दोन बाबी आज उघड झाल्या आहेत. शहरात हजारोच्या संख्येत सीसीटीव्ही आहेत. या प्रकरणात पुढे त्या सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून डी मार्ट जवळ थांबलेल्या गाडीत कोण होता, त्या गाड्या कोठून आल्या आणि नंतर कोठे गेल्या या सर्व बाबींची तपासणी सीसीटीव्ही फुटेजनुसार आता होणार आहे. भाग्यनगर येथील गुन्हा क्रमांक 288 च्या तक्रारदार महिलेला आता भरपूर काही माहित झाले आहे. पण ती फक्त याबाबत पोलीसांना सांगणार आहे. अशीही माहिती प्राप्त झाली आहे की, जे दोन युवक बार्शीच्या महिलेसोबत सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसतात. त्यांना संवेदनशिलरित्या ब्लॅकमेल करून पाठविण्यात आले होते. त्या युवकांना असे सांगण्यात आले की, एक आई आपल्या मुलांना घ्यायला जात आहे. तुम्ही फक्त सोबत जा. तो सांगणारा कोण याचाही शोध सुरू आहे. त्या युवकांना आम्ही पोलीसांना मॅनेज केले आहे असेही सांगण्यात आले होते म्हणे.पण हे सांगणाऱ्यांनी त्या महिलेनेच आपल्यावतीने आपली लेकरे परत मिळविण्यासाठी बार्शी न्यायालयात खटला दाखल केलेला आहे हे का सांगण्यात आले नाही? तसेच ज्या लेकरांना घेवून जाण्यासाठी बार्शीची महिला आली होती. तिच्या नवऱ्याने पण घटस्फोट प्रक्रिया सुरू केली आहे आणि त्या प्रक्रियेत कायद्याच्या दृष्टीकोणातून लेकरांचे भविष्य दृढ ठेवण्याची ताकत माझी आहेे म्हणून लेकरे मला द्यावीत अशी मागणी न्यायालयात केलेली आहे. त्या प्रक्रियेनुसार जो काही निर्णय न्यायालय देईल तो दोघांनाही मान्य करणे बंधनकारक आहे. पण कायद्याशी खेळणाऱ्या ऍड. मनिष रामेश्र्वर खांडील (शर्मा) यांनी कटरचून लेकरे पळवून नेण्याचा केलेला हा प्रयत्न अत्यंत प्रशंसनिय आहे. म्हणूनच भाग्यनगरमध्ये तक्रार देणाऱ्या महिलेने ऍड. मनिष रामेश्र्वर खांडील (शर्मा) यांच्या कटातून मला वाचविण्याची विनंती पोलीसांना केेलेली आहे.
संबंधीत बातमी…