ताज्या बातम्या नांदेड

बिलोलीत 1 लाख 48 हजारांचे पशुधन चोरले

नांदेड(प्रतिनिधी)-बिलोली येथे एका आखाड्यावरुन एक म्हैस, एक गाय आणि एक वासरु असे एकूण 1 लाख 48 हजारांचे पशुधन चोरीला गेले आहे.
नागेश गंगाराम खंडेराय रा.छोटी गल्ली बिलोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दि.26 जुनच्या मध्यरात्री 2 ते 4.50 या वेळेदरम्यान आपल्या शेताच्या आखाड्यावरून गोठ्यात पशुधन बांधून ते घरी गेले. तेंव्हा त्या पशुधनातील एक म्हैस, एक गाय आणि एक वासरु असे पशुधन ज्यांची एकूण किंमत 1 लाख 48 हजार रुपये आहे. कोणी तरी चोरट्यांनी चोरून नेले आहे. बिलोली पोलीसांनी हा गुन्ह दाखल केला असून पोलीस अंमलदार सोनकांबळे अधिक तपास करीत आहेत.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *