ताज्या बातम्या विशेष

बियाणी हत्याकांडात दोन आरोपींची वाढ ; 4 जुलै पर्यंत पोलीस कोठडी

नांदेड(प्रतिनिधी)-संजय बियाणी हत्याप्रकरणात आज 2 आरोपींची संख्या वाढली. आता एकूण आरोपींची संख्या 15 झाली आहे. आज पोलीस पथकाने न्यायालयात हजर केलेल्या दोघांना मकोका विशेष न्यायाधीश सी.व्ही.मराठे यांनी सहा दिवस अर्थात 4 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे.
दि.5 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्यासुमारास संजय बालाप्रसाद बियाणी या बांधकाम व्यवसायीकाची सन्मीत्रनगर नांदेड येथील त्यांच्या घरासमक्ष पिस्तुलमधून गोळ्या झाडून हत्या झाली. या प्रकरणात पोलीसांनी इंद्रपालसिंघ उर्फ सन्नी तिरथसिंघ मेजर(35) रा.चिखलवाडी नांदेड, मुक्तेश्र्वर उर्फ गोलु विजय मंगनाळे (25) रा.नाईकनगर नांदेड ,सतनामसिंघ उर्फ सत्ता दलबिरसिंघ शेरगिल(28) रा.शहीदपुरा नांदेड , हरदिपसिंघ उर्फ सोनु पिनीपाणा सतनामसिंघ बाजवा (35) रा.रामदास यात्रीनिवास नांदेड ,गुरमुखसिंघ उर्फ गुरी सेवासिंघ गिल (24) रा.शहीदपुरा नांदेड
करणजितसिंघ रघबिरसिंघ शाहु (30) रा.बढपुरा नांदेड ,हरदिपसिंघ उर्फ हार्डी उर्फ लक्की बबनसिंघ सपुरे (28) रा.मराठवाडा एकजुट प्रेसजवळ नांदेड ,कृष्णा उर्फ पप्या धोंडीबा पवार (28) रा.आमदुरा नांदेड ,हरीश मनोज बाहेती (28) रा.मारवाडगल्ली वजिराबाद नांदेड ,राजपालसिंग ईश्र्वरसिंग चंद्रावत (29) रा.रत्नीया खेडी पोस्ट रुपेटा तहसील नागदा जि.उज्जैन (मध्यप्रदेश),योगेश कैलाशचंद भाटी (30) रा.दुर्गापूरा बिरला ग्राम नागदा जि.उज्जैन (मध्यप्रदेश), रणजित सुभाष मांजरमकर (25) रा.पौर्णिमानगर नांदेड , सरहान बीन अली अल कसेरी (42) रा.किल्ला रोड, अरबगल्ली नांदेड अशा 13 जणांना अटक केली होती. सध्या ते न्यायालयीन कोठडीत अर्थात तुरूंगात आहेत.
या प्रकरणाच्या तपासात पोलीसांनी दि.27 जून 2022 रोजी रात्री 10 वाजेच्यासुमारास गुरप्रितसिंघ उर्फ दाण्या उर्फ सोनी गुलजारसिंघ खैरा (42) रा.दशमेशनगर नांदेड,कमलकिशोर गणेशलाल यादव (38) रा.दिलीपसिंघ कॉलनी वजिराबाद नांदेड या दोघांना अटक केली. आज 28 जून रोजी या दोघांना सहाय्यक पोलीस अधिक्षक अर्चित चांडक, सहाय्यक पोलीस निरिक्षक चंद्रकांत पवार, पोलीस उपनिरिक्षक सचिन सोनवणे यांच्यासह अनेक पोलीस अंमलदार आणि आरसीपी पथकातील जवांनांनी न्यायालयात हजर केले. जिल्हा सरकारी अभियोक्ता ऍड. आशिष गोदमगावकर यांनी न्यायालयासमक्ष सांगितले की, गुरप्रितसिंघ खैरा हा नात्याने फरार आरोपी हरविंदरसिंघ उर्फ रिंदा संधू याचा काका आहे, असे सांगितले. पुढे खैराने सरहान कसेरीच्या दुकानामध्ये एका थैलीत मोबाईल आणि डोंगल देवून त्याचा संपर्क रिंदाशी करून दिला होता.या संदर्भाने ते मोबाईल व डोंगल कोठून आणले. त्याच्यासोबत असलेला तो मुलगा कोण होता याचा शोध करणे आहे. तसेच दुसरा अटक आरेापी कमलकिशेार यादव याने अटक असलेल्या आरोपी हार्डीकडून पाच वॉकीटॉकी घेतले आहेत. ते वॉकीटॉकी का घेतले त्याचा वापर कोठे केला याचा शोध करणे आहे. त्यासाठी पोलीस कोठडी द्यावी अशी विनंती केली. आरोपींनी हा खूनाचा कट रचतांना विकर मी आणि सिगनल या दोन ऍपचा वापर केला आहे. या दोन आरोपींकडून त्यांचे संपर्क क्रमांक माहित करणे आहेत. त्यासंबंधीत ऍपकडून डाटा मागवून तांत्रिक विश्लेष करणे बाकी आहे यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असे सादरीकर केले. युक्तीवाद ऐकून न्यायाधीश सी.व्ही. मराठे यांनी गुरप्रितसिंघ खैरा आणि कमलकिशोर याद या दोघांना आज सहा दिवस अर्थात 4 जुलै 2022 पर्यंत पोलीस कोठडी पाठविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *