ताज्या बातम्या नांदेड

कृषि दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

नांदेड (प्रतिनिधी)-माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी कृषि क्षेत्रात केलेल्या भरीव योगदानाबद्दल 1 जुलै हा त्यांचा वाढदिवस कृषिदिन म्हणून साजरा करण्यात येतो. यावर्षी जिल्हा परिषदेच्या कृषि विभागातर्फे कृषि दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. कृषि दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या संकल्पनेतुन शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये कृषि विषयक जनजागृती करण्यासाठी जिल्हयातील सर्व शाळामध्ये 1 जुलै रोजी कृषि विषयक माहिती वाचुन दाखविण्यात येणार आहे.

1 जुलै 2022 रोजी जिल्हा व तालुका स्तरावर कृषिदिनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या दिवशी जिल्हा परिषदेत शेंद्रीय गहु, गुळ, हळद, दाळी तसेच गांडुळ खत विक्री, सेंद्रीय भाजीपाला विक्रीसाठी बळवंत पौळ बनचिंचोली हदगाव, भगवानराव इंगोले (कृषि भूषण सेंद्रीय शेती) यांचा स्टॉल असणार आहे. कृषि विषयक ज्ञान मिळण्यासाठी ॲग्रोवन मार्फत कृषि विषयक विविध पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. या दिवशी शेती क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा वृक्ष देवून गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना किटकनाशक फवारणी करतांना वापरावयाची सेफ्टी किटचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी खरीप पिकावरील कीड व रोग तसेच हवामान बदल आधारीत शेती पध्दती या विषयावर शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. तसेच जिल्हयातील शेतीक्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या शेतकऱ्यांचे मार्गदर्शन होणार आहे. तालुकास्तरावर पंचायत समिती व कृषि विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्यत्वाने शेतकऱ्यांच्या शेतावर फळबाळ लागवड, विहीरीचे जलपुजन, विहीर पुर्नभरण, बीबीएफ यंत्राद्वारे पेरणी करण्यात येणार आहे असे कृषि विकास अधिकारी डॉ. टी. जी. चिमणशट्टे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *