ताज्या बातम्या नांदेड (ग्रामीण)

30-35 वर्षाचा अनोळखी मयत माणुस सापडला; नांदेड ग्रामीण पोलीसांचे ओखळ पटविण्यासाठी जनतेला आवाहन

नांदेड(प्रतिनिधी)-नांदेड तालुक्यातील पुणेगाव जवळ असलेल्या गोदावरी नदीवरील पुलाखाली एक 30-35 वर्ष वयोगटातील सरदारजी व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. या अनोळखी मयताची ओळख पटविण्यासाठी जनतेने मदत करावी असे आवाहन नांदेड ग्रामीण येथील पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांनी केले आहे.
दि.23 जून रोजी दुपारी 12 वाजेच्यासुमारास पुणेगाव जवळ गोदावरी नदीवर असलेल्या पुलाखाली एक मृतदेह तरंगतांना दिसला. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदार त्या ठिकाणी पोहचले आणि तपासणी केली असता मयत व्यक्ती हा सरदारजी आहे. त्याचे शरिर बऱ्याच दिवसापासून पाण्यात असल्याने ते सडले आहे. जनतेतील कोणाला या अनोळखमी मयताबद्दल माहिती असेल तर त्यांनी याबाबतची माहिती नांदेड ग्रामीण पोलीस ठाणे अथवा या आकस्मात मृत्यूचे तपासीक अंमलदार चक्रधर यांच्याशी संपर्क साधून माहिती द्यावी असे आवाहन पोलीस निरिक्षक दिपक बोरसे यांनी केले आहे.
हा अनोळखी मयत माणुस पाण्याबाहेर काढतांना पोलीस उपनिरिक्षक आणि त्यांचा सहकारी पोलीस अंमलदार यांनी दोन जणांची मदत घेवून हे काम पुर्ण केले. पोलीसांवर त्यांच्या चुकांसाठी कटाक्ष करण्याचा अधिकार आम्हाला आहे तसाच त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल सुध्दा आम्ही त्यांची पाठ थोपटीली पाहिजे तरच ते जास्त जोमाने काम करतील. मरण पावलेला व्यक्ती कांही त्यांचा नातलग नाही पण त्यांनी स्विकारलेली नोकरी आणि त्यातील त्यांचे कर्तव्य म्हणून त्यांनी ते केले असले तरी केलेली मेहनत नक्कीच दखल योग्य आहे.

Kanthak Suryatal
Chief Editor | VastavNEWSlive.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *