नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर पोलीस ठाण्यात शासकीय व्यक्ती असलेल्या नगर पालिका देगलूर येथील लोकांनी त्यांच्या विविध अर्जांना कंटाळून त्यांना पैसे मागीतले तसेच उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथील कनिष्ठ लिपीकांनी पेैसे मागीतल्या प्रकरणी खंडणीचे तीन गुन्हे आकाश विठ्ठलराव देशमुख विरुध्द दाखल करण्यात आले आहेत. यापुर्वी आकाश देशमुख पोलीस कोठडीत होते.
उपजिल्हा रुग्णालय देगलूरमध्ये कार्यरत कनिष्ठ लिपीक बाबूराव किशनराव येरसनवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार माहितीच्या अधिकारात अर्ज देवून आकाश विठ्ठलराव देशमुख यांनी २१ जून २०२२ रोजी माझ्याकडून २० हजार रुपये मागितले. मी मागितलेली माहिती मागणार नाही असे सांगितले. मी मागितलेली माहिती देतो असे सांगितले तेंव्हा आकाश देशमुखने तुम्हाला ५ हजार रुपये तरी द्यावे लागतील नाही तर तुझी नोकरी घालवितो अशी धमकी दिली. या तक्रारीवरुन देगलूर पोलीसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ५०६ नुसार गुन्हा क्रमांक २९८/२०२२ दाखल केला आहे.
देगलूर नगर पालिकेत कार्यरत संतोष विठ्ठलराव देशमुख यांनीही अशीच तक्रार दिली त्यात ६ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. हा प्रकार २०१३ पासून सुरू होता आणि ६ हजार रुपयांची मागणी ८ मार्च २०२२ रोजी करण्यात आली होती. या संदर्भाने सुध्दा देगलूर पोलीसांनी खंडणीच्या सदरात कलम ३८४ प्रमाणे गुन्हा दाखल केेला.
नगर परिषद कार्यालयातील अशोक जळबाजी पाटील यांना सुध्दा पाच हजार रुपयांची मागणी करण्यात आली होती. हा प्रकार घडल्यानंतर पोलीसांनी वर्तमानपत्रातून खंडणीसंदर्भाने कोणी त्रास दिला असेल तर तक्रार द्या असे आवाहन केले होते. म्हणून मी तक्रार देत आहे असे या तक्रारीत लिहिले आहे. देगलूर पोलीसांनी अशोक देशमुख विरुध्द दाखल केलेल्या गुन्ह्यांचे क्रमांक अनुक्रमे २९८, २९९ आणि ३००/२०२२ असे आहेत. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहेत. माहिती अधिकारात अर्ज देवून त्याच्या पार्श्वभूमीत कोणी खंडणी मागत असेल तर पोलीस विभागाकडे तक्रारी द्या त्याची आम्ही दखल घेवू असे आवाहन पोलीसांनी केले होते. त्यातील प्रतिसादामुळेच एकाच दिवशी तिन गुन्हे दाखल होण्याचा हा प्रकार घडला आहे असे लिहिले तर चुक ठरणार नाही.