नांदेड(प्रतिनिधी)-धर्माबाद पोलीसांनी एका 45 वर्षीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर जवळपास दोन महिन्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतर 14 जणांविरुध्द खूनाचा गुन्हा दाखल केला आहे.
दि.4 एप्रिल 2022 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेदरम्यान मौजे धानोरा (बु) ता.उमरी येथील चिंचाळा शाखा कॅनल येथे लक्ष्मण संभाजी बोईबार रा.रावधानोरा (बु) ता.उमरी यांचा मृतदेह सापडला. त्यावेळी या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या पत्नी मुक्ताबाई लक्ष्मण बोईबार यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर धर्माबाद पोलीसांनी आता 20 जून 2022 रोजी लक्ष्मण संभाजी बोईबार यांचा खून करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी 14 जणंाविरुध्द भारतीय दंड संहितेच्या कलम 302, 201 आणि 34 नुसार गुन्हा क्रमांक 158/2022 दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरिक्षक संजय हिबारे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक पंतोजी यांच्याकडे देण्यात आला आहे.
