नांदेड(प्रतिनिधी)-देगलूर येथील एका डॉक्टरांना वेगवेगळ्या कारणासाठी खंडणी मागून त्यांचे हॉस्पीटल बांधू देणार नाही अशी धमकी देणाऱ्याविरुध्द देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. माहितीची अधिकार वापरून प्राप्त झालेल्या माहिती अधिकारानुसार हा डॉक्टरांचा छळ सुरू होता.
डॉ.शेख तन्वीर शेख रफियोद्दीन यांनी दिलेल्या तक्रारीनुसार देगलूर येथील सुगतकुमार रमेश केरुरकर हे त्यांना गट क्रमांक 43 भुखंड क्रमंाक 1 वर दवाखाना बांधत असतांना त्रास देत होते. देगलूर नगर परिषदेने याबाबत तपासणी केली. तरीपण सुगतकुमार केरुरकरचे समाधान होत नव्हते. 17 सप्टेंबर 2021 रोजी बसस्थानकासमोरील दवाखान्यात बसून दवाखान्याचे बांधकाम मंजुरीपेक्षा जास्त व मंजुर नकाशाविरुध्द आहे. याबाबत चर्चा केली आणि असे अर्ज पुन्हा न देण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर 20 हजार रुपये घेतले. आणि 18 जून 2021 रोजी आपला अर्ज मागे घेतल्याचे दखावले. या तक्रारीवरुन देगलूर पोलीसांनी सुगतकुमार रमेश केरुरकरविरुध्द गुन्हा क्रमांक 295/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 384, 506 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पोलीस निरिक्षक सोहन माछरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक मोरे अधिक तपास करीत आहेत.
