नांदेड,(प्रतिनिधी)-नांदेड आम आदमी पार्टी नांदेड जिल्हा कार्यकारणी ची महत्वाची बैठक नुकतीच अनमोल निवास चिखलवाडी नांदेड येथे आम आदमी पार्टीचे नेते नरेंद्रसिंघ ग्रंथी यांच्या मार्गदर्शनाखाली व नांदेड आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम यांच्या अध्यक्षते खाली संपन्न झाली.या बैठकीत आम आदमी पार्टीचे ध्येय धोरण हे तळागळातील लोकांपर्यत पोहचण्यासाठी सर्वतोपर्यंत प्रयत्न कार्यकारणीतील सर्व पद्धाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे असे ठरले व या वेळी नांदेड अभिवक्ता संघाचे माजी उपाध्यक्ष अँड जगजीवन भेदे यांना सामाजिक व राजकीय चळवळीचा अनुभव आहे. त्यांचा आम आदमी पार्टीस नक्कीच होईल ही भुमिका पार्टीचे जेष्ठ नेते नरेंद्रसिंघ ग्रंथी यांनी मांडली.या भुमिकेस पांठीबा म्हणून आम आदमी पार्टी चे सहसचीव अँड.पाडमुख यांनी प्रस्ताव दिला.यास अनुमोदन डॉ. अवधुत पवार यांनी यांनी दिले. अँड. जगजीवन तुकाराम भेदे यांच्या निवडीचा प्रस्तावास महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टीची मान्यता मिळाल्यानंतर दि.१७ जून २०२२रोजी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात संपन्न झालेल्या नांदेड येथील आम आदमी पार्टीच्या आढावा कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रंगादादा राचुरे यांच्या हस्ते अँड जगजीवन तुकाराम भेदे यांची आम आदमी पार्टी नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुखपदी निवड केल्याचे नियुक्तीपत्र अँड जगजीवन भेदे यांना देतांना यावेळी महाराष्ट्र प्रदेश आम आदमी पार्टी चे संघटन मंत्री सुग्रीव मुंढे, नांदेड जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम,नरेंद्र सिंघ ग्रंथी. डॉ.अवधुत पवार. अजीत पाटील. डॉ. कादरी यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
अँड जगजीवन भेदे यांच्या निवडीचे स्वागत अँड. पाडमुख, जिंदाल,संग्राम गिते,अँड. भगवान शिंदे सुभाष कठारे.खानसोळे ,दिलीप जोंधळे,डॉ. गौतम कापुरे,अँड. शिलवृत शिवभगत,अँड. प्रशांत माळी. अँड.रामसिंघ मठवाले,आकाश गच्चे, अँड. प्रियंका मोरे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.